Offer On Gamig Earbuds: तुम्ही जर ख्रिसमस आणि नववर्षाच्या निमित्ताने मित्र-मैत्रिणी अथवा नातेवाईकांना गिफ्ट देण्याचा विचार करत असल्यास इयरबड्स हे चांगले पर्याय ठरतील. बाजारात कमी किंमतीत येणारे चांगल्या कंपन्यांचे अनेक शानदार इयरबड्स उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे वायर्ड हेडफोनऐवजी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येणारे इयरबड्स खरेदी करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.
ई-कॉमर्स साइट Amazon वर सुरू असलेल्या सेलमध्ये तुम्ही आकर्षक ऑफर्ससह येणारे इयरबड्स खरेदी करू शकता. सेलमध्ये Realme आणि Boult Audio सारख्या कंपन्यांचे बड्स स्वस्तात उपलब्ध आहेत. या बड्सची सुरुवाती किंमत फक्त ९९९ रुपये आहे. Amazon Sale मध्ये स्वस्तात उपलब्ध असलेल्या या इयरबड्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
हेही वाचा: काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये
ZEBRONICS Sound Bomb 9
ZEBRONICS च्या या बड्सची मूळ किंमत २,९९९ रुपये आहे. परंतु, सेलमध्ये ६७ टक्के डिस्काउंटनंतर तुम्ही फक्त ९९९ रुपयात खरेदी करू शकता. हे बड्स ब्लॅक आणि व्हाइट अशा दोन रंगात उपलब्ध आहेत. ZEBRONICS च्या या बड्सला एकदा चार्ज केल्यानंतर १६ तास सहज वापरू शकता. शानदार साउंडसाठी यात ENC टेक्नॉलोजी दिली आहे. तसेच, १३एमएमचे ड्राइव्हर मिळतात. गेमिंगसाठी लो लेटेंसी मोड देखील आहे. यामध्ये तुम्हाला वॉइस असिस्टेंट फीचरचा देखील सपोर्ट मिळेल.
Boult Audio X30
२ हजार रुपयांच्या बजेटमध्ये इयरबड्स खरेदी करण्याचा विचार असल्यास Boult Audio X30 हे चांगले पर्याय आहेत. या बड्सची मूळ किंमत ४,९९९ रुपये आहे. परंतु, ६८ टक्के डिस्काउंटनंतर फक्त १,५९९ रुपयात खरेदी करता येईल. हे बड्स ब्लू आणि ग्रे रंगात येतील. बड्स ४० तासांच्या प्लेबॅक टाइमसह येतात. गेमिंगदरम्यान शानदार अनुभव मिळावा यासाठी ४५ms लेटेंसी मोड देखील मिळतो. कॉलिंगसाठी क्वाड माइक दिले आहे. बड्समध्ये ENC टेक्नॉलोजीसह इक्वालाइजर मोड देखील मिळेल. हे फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतात.
realme Buds Air 3 Neo
ब्रँडेड इयरबड्स हवे असल्यास realme Buds Air 3 Neo चा विचार करू शकता. बड्सची मूळ किंमत ३,४९९ रुपये आहे. परंतु, ४३ टक्के डिस्काउंटनंतर फक्त १,९९९ रुपयात खरेदी करता येईल. हे बड्स ब्लॅक, व्हाइट आणि ब्लू रंगात येतात. यामध्ये १०एमएम ड्राइव्हर दिले असून, जे Dolby Atmos वॉइस टेक्नोलॉजीसह येतात.
कॉलिंगदरम्यान स्पष्ट आवाज यावा यासाठी AI ENC टेक्नोलॉजीचा सपोर्ट मिळेल. बड्सला एकदा चार्ज केल्यावर ३० तास वापरू शकता. तसेच, १० मिनिटांच्या चार्जमध्ये २ तास गाणी ऐकणे शक्य आहे. यात गेमिंगसाठी लो लेटेंसी मोड देखील मिळेल. बड्सला वॉटर रेसिस्टेंटसाठी आयपीएक्स५ रेटिंग मिळाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.