नवी दिल्ली- 8 जूनला अॅमेझॉनने Sidewalk नावाचे फिचर लाँच केले आहे. या फिचरमुळे तुमच्या घरातील उपकरणे इंटरनेटशी कनेक्ट राहण्यास मदत होणार आहे. अॅमेझॉनचे इको स्मार्ट स्पिकर्स किंवा रिंग कॅमेरा या नव्या फिचरमुळे इंटरनेटशी सतत कनेक्ट राहतील. तुम्ही जोपर्यंत स्व:ताहून याला डिसकनेक्ट करत नाही, तोपर्यंत ही उपकरणे Sidewalk शी कनेक्ट राहतील. अमेझॉन गेल्या अनेक दिवसांपासून Sidewalk बाबत बोलत आला आहे. त्यामुळे अखेर मंगळवारी याचे लाँचिंग झालं आहे. (Amazon Sidewalk launches What to know before sharing your home bandwidth internet sharing service)
Sidewalk तुमच्या घरातील सर्व अॅमेझॉन उपकरणांना ऑटोमॅटिक कनेक्ट करेल. जर अशा उपकरणांनी इंटरनेट कनेक्शन गमावलं तर Sidewalk तुमच्या घराच्या परीसरातील बँडविड्थचा शोध घेईल. जेणेकरुन, तुमची उपकरणे 24 तास इंटरनेटशी कनेक्ट राहतील. जर तुम्हाला तुमचे उपकरणे ऑटोमॅटिकरीत्या कनेक्ट होऊ नये, असं वाटत असेल तर तुम्ही सेंटिगमध्ये जाऊन पर्याय निवडू शकता.
अॅमेझॉनने Sidewalk संबंधी युजर्सचा खासगीपणा आणि सुरक्षेची हमी दिली आहे. त्यामुळे तुमचा डेटा दुसरा कोणी पाहू शकण्याची शक्यता कमी आहे. असे असले तरी तुमचे इंटरनेट कनेक्शन दुसऱ्याशी शेअर करण्याआधी विचार करायला हवा. आपल्या घरातील उपकरणे बाय डिफॉल्ट प्रायव्हेट असतात, पण जेव्हा ते नसतात तेव्हा तुम्ही याबाबत पर्याय निवडू शकता. जे युझर्स शेजाऱ्यांसोबत आपले बँडविथ शेअर करणार आहेत. त्यांना एकमेकांना डेटा दिसणार नाही, असं अॅमझॉन कंपनीने सांगितलंय.
Sidewalk महिन्याला तुमचा 500 MB डेटा वापरेल. Sidewalk फिचर तुम्हाला योग्य वाटले नाही, तर तुम्ही त्याला कधीही बंद करु शकता. तुम्हाला Echo फॅमिली स्पिकर डिसकनेक्ट करायचा असेल तर मोबाईलमध्ये अॅलेक्सा मोबाईल अॅप सुरु करा. सेंटिंगमध्ये अकाऊंट सेटिंगमध्ये जा. तेथे Amazon Sidewalk पर्याय दिसेल, येथे तुम्ही Disable पर्याय निवडा. Ring app साठी कंट्रोल सेंटरमध्ये जा, तेथे Amazon Sidewalk मध्ये जाऊन तुम्ही उपकरण Disable करु शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.