तुम्ही जर नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल, आणि सॅमसंग हा तुमचा आवडता ब्रँड असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 16 ते 19 जून दरम्यान ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉनवर स्मार्टफोन बोनान्झा सेल (Amazon Smartphone sale) आयोजित करण्यात आला आहे. या सेलमध्ये सॅमसंग एम सीरीजच्या स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे.
या सेलमध्ये Samsung Galaxy M14 5G, Samsung Galaxy M13 आणि Samsung Galaxy M04 Amazon वर नोकॉस्ट EMI, बँक आणि एक्सचेंज ऑफर्ससह खूप पैसे वाचवता येणार आहेत. नेमक्या काय आहेत या ऑफर्स? (Amazon Samsung offers) जाणून घेऊयात..
Samsung Galaxy M14 5G
Samsung Galaxy M14 5G च्या 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत १३,९९० रुपये आहे. हा फोन नो-कॉस्ट ईएमआय, बँक आणि एक्सचेंज ऑफरसह खरेदी केला जाऊ शकतो. याचे फीचर्स म्हणाल तर Samsung Galaxy M14 5G मध्ये ६.६ इंचाचा LCD फुलएचडी+ रिझोल्यूशन डिस्प्ले आहे.
यामध्ये ५० मेगापिक्सल प्राइमरी, २ मेगापिक्सलचे दोन असे तीन सेन्सर आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये Exynos 1330 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हँडसेट Android 13 आधारित One UI Core 5.0 सह येतो. या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
Samsung Galaxy M04
Samsung Galaxy M04 च्या 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ७,२९९ रुपये आहे. हा फोन नो-कॉस्ट ईएमआय, बँक आणि एक्सचेंज ऑफरमध्ये घेतला जाऊ शकतो. Galaxy M04 Android 12 सह येतो. हँडसेटमध्ये पावरफुल MediaTek Helio P35 ऑक्टा-कोर चिपसेट देण्यात आला आहे.
या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सलचे दोन रेअर कॅमेरे आहेत. हँडसेटला पॉवर करण्यासाठी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. 4 जीबी रॅमसह स्मार्टफोन 128 जीबी स्टोरेज वेरिएंटमध्ये देखील घेतला जाऊ शकतो.
Samsung Galaxy M13
Samsung Galaxy M13 Amazon वर केवळ ९,६९९ रुपयांना मिळत आहे. हा हँडसेट 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज वेरिएंटमध्ये घेतला जाऊ शकतो. स्मार्टफोनवर नो-कॉस्ट ईएमआय, बॅक आणि एक्सचेंज ऑफर देखील आहेत. याचे स्पेसिफिकेशन्स म्हणाल तर Samsung Galaxy M13 मध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे. या हँडसेटमध्ये 12 GB पर्यंत रॅमचा पर्याय उपलब्ध आहे.
या फोनमध्ये रॅम प्लस फीचर देखील आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सल प्रायमरी, 5 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचे तीन रेअर सेन्सर देखील आहेत. स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन Android 12 आधारित One UI Core 4 सह येतो. याची स्क्रिन ६.७ इंच फुलएचडी+ आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.