Ampere Magnus EX sakal
विज्ञान-तंत्र

Electric Scooters: अवघ्या 80 हजारात मिळतेय शानदार इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये 100KM धावणार

८० हजार रुपयांच्या बजेटमध्ये तुम्ही Ampere Magnus EX इलेक्ट्रिक स्कूटरला खरेदी करू शकता. या स्कूटरमध्ये अनेक शानदार फीचर्स मिळतील.

सकाळ डिजिटल टीम

Ampere Magnus EX Details: भारतीय बाजारात सध्या इलेक्ट्रॉनिक वाहनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. खासकरून, दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्ही जर नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Ampere Magnus EX चांगला पर्याय आहे.

Ampere Magnus EX या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमत, रेंज, टॉप स्पीड आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Ampere Magnus EX ची किंमत

Ampere Magnus EX ला कंपनीे केवळ एकाच स्टँडर्ड व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. गाडीची एक्स-शोरूम किंमत ७७,२४९ रुपये आहे. तर ऑन रोड किंमत ८१,०९३ रुपयांपर्यंत जाते.

Ampere Magnus EX ची बॅटरी

Ampere Magnus EX मध्ये 0 V, 38.25 Ah क्षमतेची लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरीला २१०० वॉट पॉवरच्या BLDC इलेक्ट्रिक मोटरसोबत जोडण्यात आले आहे. कंपनीनुसार, बॅटरीला फुल चार्ज होण्यासाठी जवळपास ६ ते ७ तास लागतात.

हेही वाचा: Recharge Plans: 'या' कंपनीने ग्राहकांना दिला झटका, रिचार्ज प्लॅन्सच्या किंमतीत वाढ; वैधता कमी

एकदा चार्ज केल्यावर गाडी सहज १०० किमी अंतर पार करू शकते. गाडीचा टॉप स्पीड ताशी ५० किमी आहे. कंपनीचा दावा आहे की, स्कूटर अवघ्या १० सेकंदात ताशी ० ते ४० किमीचा वेग पकडते.

इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये फ्रंट आणि रियर दोन्ही व्हीलमध्ये ड्रम ब्रेक देण्यात आला आहे. यासोबत कॉम्बी ब्रेकिंग सिस्टमला जोडण्यात आले आहे. स्कूटरच्या फ्रंटला टेलिस्कोपिक सस्पेंशन सिस्टम आणि रियरला कॉइल स्प्रिंग आधारित शॉक एब्जॉर्बर सिस्टम देण्यात आली आहे.

फीचर्सबद्दल सांगायचे तर यामध्ये रिमोट स्टार्ट, पुश बटन स्टार्ट, अँटी थेफ्ट अलार्म, डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल, डिजिटल ट्रिप मीटर, डिजिटल स्पीडोमीटर, फ्रंट ग्लोव्ह बॉक्स, एलईडी हेड लाइट, एलईडी टेल लाइट, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प सारखे फीचर्स मिळतील.

हेही वाचा: ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT