aadhaar card Sakal
विज्ञान-तंत्र

'आधार'वरील फोटो आवडला नाही? झटक्‍यात बदलण्याचा 'हा' सोपा मार्ग

आधार कार्डवरील फोटो आवडला नाही? तर झटक्‍यात बदलण्याचा 'हा' आहे सोपा मार्ग

सकाळ वृत्तसेवा

अनेक वर्षांपूर्वी आधार कार्डसाठी अर्ज केलेल्या लोकांचे आधार कार्डवरील फोटोज कालबाह्य झाले आहेत.

आधार कार्ड (Aadhaar Card) हे भारतातील (India) सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र आहे. आधार कार्ड केवळ सरकारी योजनांसाठीच नाही तर आर्थिक सेवांसाठीही आवश्‍यक झाले आहे. हे बॅंक (Bank) खाती, वाहने आणि विमा पॉलिसी (Insurance Policies) आदींशी देखील जोडलेले आहे. आधार कार्डमध्ये व्यक्तीचे नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता आणि छायाचित्र यांचा तपशील असतो. आपल्यापैकी बहुतेकांनी अनेक वर्षांपूर्वी आधार कार्डसाठी अर्ज केला होता, त्यामुळे काही लोकांचे आधार कार्डवरील फोटोज कालबाह्य झाले आहेत. ओळखण्यायोग्य फोटो नसणे ही देखील काही लोकांसाठी समस्या बनली आहे. तुम्हीही अशा लोकांपैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. (An easy way to quickly replace an old photo on an Aadhaar card)

आधार कार्डमधला फोटो बदलण्याचा अतिशय सोपा मार्ग

आधार कार्डवरील जुने किंवा न ओळखता येणारे फोटोज आता एका साध्या आणि सोप्या प्रक्रियेद्वारे तुमच्या आवडीनुसार अपडेट केले जाऊ शकतात. आधार नोंदणी केंद्र (Aadhaar Enrollment Center) किंवा आधार सेवा केंद्राला (Aadhaar Seva Kendra) भेट देऊन आधारवर फोटो बदलता येईल. तथापि, त्यासाठी UIDAI च्या वेबसाइटवरून आधार नोंदणी फॉर्मची आवश्‍यकता आहे.

आधारमध्ये फोटो बदलण्याची ही आहे प्रक्रिया

  • आधार कार्डमधील फोटो बदलण्यासाठी सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइट (uidai.gov.in) Get Aadhaar सेक्‍शनमध्ये जाऊन आधार नोंदणी फॉर्म किंवा सुधारणा / अपडेट फॉर्म डाउनलोड करा.

  • हा फॉर्म पूर्णपणे भरा आणि आधार परमनंट एनरॉलमेंट सेंटरमध्ये बसलेल्या एक्‍झिक्‍युटिव्हला द्या.

  • यानंतर आता तुम्हाला तुमची बायोमेट्रिक डिटेल्स एक्‍झिक्‍युटिव्हला द्यावी लागतील. जर तुम्हाला फॉर्म डाउनलोड करायचा नसेल तर तुम्हाला तो केंद्रावरही मिळेल.

  • त्यानंतर आधार नोंदणी केंद्रावरील कर्मचारी तुमचा लाइव्ह फोटो क्‍लिक करेल.

  • फोटो बदलण्यासाठी तुम्हाला केंद्रावर 50 रुपये भरावे लागतील, ज्यात करही समाविष्ट आहे.

  • पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक पोचपावती स्लिप मिळेल, ज्यामध्ये अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) असेल. तुम्ही URN वापरून आधार कार्डची अपडेटेड स्थिती तपासू शकता.

  • आधार कार्डमध्ये तुमचा फोटो अपडेट केल्यानंतर तुम्ही आधार फक्त ऑनलाइन डाउनलोड करू शकता.

आधार कार्डवरील फोटो अपडेट करताना लक्षात ठेवा या गोष्टी

  • तुमच्या आधार कार्डवरील फोटो बदलण्यासाठी तुम्हाला कोणत्याही कागदपत्राची गरज नाही.

  • तुम्हाला फोटो सबमिट करण्याची आवश्‍यकता नाही; कारण कर्मचारी वेबकॅम वापरून त्याचवेळी फोटो क्‍लिक करतो.

  • आधारमध्ये तपशील अपडेट होण्यासाठी 90 दिवस लागू शकतात.

  • दिलेल्या URN चा वापर करून तुम्ही आधार अपडेट स्थिती ऑनलाइन तपासू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT