Yazdi esakal
विज्ञान-तंत्र

Mahindra ने 'या' बाईकला दिले नव रुप, भारतात २६ वर्षानंतर होणार लाँच

महिंद्रा अँड महिंद्राने बाईक बनवणाऱ्या जुन्या प्रसिद्ध ब्रँडला नव रुप दिले आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : महिंद्रा अँड महिंद्राने दुचाकी बनवणाऱ्या जुन्या प्रसिद्ध ब्रँडला नव रुप दिले आहे. जवळपास २६ वर्षानंतर तिची मोटारसायकल भारतात पुन्हा सादर केली जाणार आहे. ती राॅयल एनफिल्डसारख्या (Royal Enfield) मोठ्या ब्रँडला टक्कर देईल. महिंद्रा समुहाच्या क्लासिक लिजेंड्सने (Classic Legends) काही वर्षांपूर्वी जावा मोटारसायकल (Jawa Motorcycle) आणि ब्रिटनच्या बीएसए मोटारसायकलला (BSA Motorcycle) नव संजीवनी दिली होती. आता हिच कंपनी मोटारसायकलची आणखीन एक प्रसिद्ध ब्रँड येझदीला (Yezdi)पुन्हा नव्या रुपात आणत आहे. काही दिवसांपूर्वी आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी ट्विटवर तिचा टिझर शेअर केला होता. क्लासिक लिजेंड्स जानेवारीत येझ्दी ब्रँडची पहिली बाईक येझ्दी रोडकिंग भारतीय बाजारात लाँच करणार आहे. जवळपास २६ वर्षांपूर्वी १९९६ मध्ये तिची शेवटची युनिटची विक्री झाली होती. या व्यतिरिक्त कंपनी येझदी अॅडव्हेन्चर आणि येझदी स्क्रॅब्लरही सादर करु शकते.(Anand Mahindra Group Owned Lassic Legends To Be Launch Yezdi Bikes)

येझ्दी रोडकिंगचे वैशिष्ट्ये

Yezdi Roadking मध्ये ३३४ सीसीचे सिंगल सिलिंडर इंजिन होण्याची शक्यता आहे. हे जावा पर्कमध्ये दिसले आहे. हे इंजिन ३० बीएचपीची मॅक्स पाॅवर आणि ३२.७४ एनएमचे पीक टाॅर्क जेनरेट करेल. यात ग्राहकांना ६ स्पीड गिअर बाॅक्स मिळू शकते. इतकेच नाही या मोटारसायकलमध्ये पुढच्या बाजूला २१ इंचाचे स्पोक व्हिल आणि १७ इंचाचे व्हिल मागे असेल. दोन्ही बाजूंनी डिस्क ब्रेकही होईल.

किंमत किती असेल ?

येझ्दी रोडकिंगची किंमत जवळपास १.६० लाख रुपये असू शकते. दुसरीकडे येझ्दी अॅडव्हेंचरची किंमत २.१० लाख रुपयांपर्यंत कंपनी ठेवू शकते. बाजारात तिची टक्कर राॅयल एनफिल्डच्या अनेक ब्रँडबरोबर असेल विशेषतः हिमालयनशी असू शकते. मात्र हिमालयन ४०० सीसी सेगमेंटची बाईक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT