Anand Mahindra on ChatGPT : देशातील प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. विविध नवीन गोष्टींबाबत ते अगदी खुल्या मनाने आपली प्रतिक्रिया देतात. नुकतीच त्यांनी चॅटजीपीटी या एआय टूलबाबत (AI Tool) देखील आपलं मत व्यक्त केलं आहे.
तामिळनाडूमध्ये होत असलेल्या ग्लोबल इन्व्हेस्टर समिटला ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी ओपन एआय कंपनीचा चॅटबॉट (Open AI Chatbot) वापरण्याचा आपला अनुभव शेअर केला. ते म्हणाले, की "इव्हेंटच्या आधीच मी एआय चॅटबॉटला हे विचारलं की तामिळनाडूमध्ये का गुंतवणूक करावी? यावर मला नक्कीच काही चांगली उत्तरं मिळाली." एबीपीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
आपल्या भाषणामध्ये घेण्यासाठी आनंद महिंद्रांना (Anand Mahindra) चॅटजीपीटीने बरेच मुद्दे सांगितले. तामिळनाडूमध्ये चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, स्किल्ड वर्कफोर्स आहे, पोर्ट एरिया विकसित आहे, चांगलं शिक्षण दिलं जातं, सरकारचा पाठिंबा आहे अशा बऱ्याच गोष्टी चॅटजीपीटीने सांगितल्या
"चॅटजीपीटीने दिलेल्या या माहितीवरुन मी चांगलं भाषण नक्कीच देऊ शकतो. मात्र या उत्तरामध्ये तामिळनाडूबद्दल मानवी अनुभवाची कोणतीच माहिती दिलेली नव्हती. चॅटजीपीची विविध ठिकाणावरुन माहिती गोळा करू शकतो, मात्र यामध्ये ह्यूमन टचचा अभाव आहे. ही गोष्ट कोणत्याही क्षेत्रासाठी भरपूर महत्त्वाची आहे", असं महिंद्रा म्हणाले.
दरम्यान, आनंद महिंद्रा यांनी गेल्याच वर्षी तामिळनाडूमधील प्रकल्पांच्या घोषणा केल्या होत्या. चेंगलपट्टूमध्ये असणाऱ्या महिंद्रा रिसर्च व्हॅलीमध्ये एक इलेक्ट्रिक वाहन बॅटरी चाचणी फॅसिलिटी उभारण्यात येणार आहे. सोबतच, चेय्यर इंडस्ट्रियल पार्कमध्ये महिंद्रा एसयूव्ही प्रोव्हिंग ट्रॅक आणि सिपकॉटमध्ये एक क्रॅश टेस्ट फॅसिलिटी उभारण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.