Hidden Feaures in Android Mobile esakal
विज्ञान-तंत्र

Mobile Feature : मोबाईलमध्ये लपलेले 'हे' 5 फीचर, तुमचं दैनंदिन जीवन बदलून टाकतील

Hidden Feaures in Android Mobile : Android ऑपरेटिंग सिस्टिममध्ये लपलेले फिचर्स कोणते जाणून घ्या.

Saisimran Ghashi

Smartphone Tips : तुमच्या Android स्मार्टफोनच्या वापराचा अनुभव आणखी सोपा आणि सोयीस्कर बनवू शकणाऱ्या काही फिचर्सबद्दल तुम्हाला माहिती आहे का? Android ऑपरेटिंग सिस्टिममध्ये अशा काही लपलेल्या सोयी आहेत, ज्या तुमच्या रोजच्या जीवनाला सोप बनवू शकतात. चला तर मग, या 5 फिचर्सचा उपयोग करून पाहा आणि तुमच्या स्मार्टफोनचा फायदा अधिकाधिक घ्या.

1. QR कोडद्वारे वाय-फाय शेअर करा वाय-फाय पासवर्ड सांगून शेअर करण्याची गरज नाही. Android फोन वापरत असाल, तर तुम्ही QR कोडच्या माध्यमातून सुरक्षितपणे वाय-फाय शेअर करू शकता.

कसं कराल?

सेटिंग्समध्ये जा > नेटवर्क आणि इंटरनेट > इंटरनेट > तुमचं नेटवर्क निवडा > शेअर निवडा > तुमचं ओळख प्रमाणित करा. आता QR कोड स्कॅन करून तुमच्या पाहुण्यांना वाय-फाय शेअर करा.

2. डेवलपर ऑप्शन्स वापरून अ‍ॅडव्हान्स फीचर्स सक्रिय करा Android फोनमध्ये डेवलपर ऑप्शन्सवर तुम्हालाही काही विशेष कंट्रोल मिळू शकतो, जसे USB डिबगिंग सेटअप करणे किंवा Bluetooth कनेक्शन्स कस्टमाईझ करणे.

कसं कराल?

सेटिंग्समध्ये जा > अबाउट फोनवर जा > बिल्ड नंबरवर सात वेळा क्लिक करा. आता सेटिंग्समध्ये डेवलपर ऑप्शन्स शोधा आणि तिथून अ‍ॅडव्हान्स फीचर्स अ‍ॅक्सेस करा.

3. कॅमेराद्वारे रिअल-टाइम टेक्स्ट ट्रान्सलेशन परदेशात प्रवास करत असाल आणि भाषेची अडचण येत असेल, तर Android च्या Lens टूलचा वापर करून कॅमेऱ्याद्वारे टेक्स्ट ट्रान्सलेट करा.

कसं कराल?

सर्च बारमधील Lens आयकॉनवर क्लिक करा > कॅमेरा टेक्स्टवर ठेवा > ट्रान्सलेट निवडा. एका क्षणात ट्रान्सलेशन मिळवा.

4. विश्वासू लोकेशन्ससाठी अनलॉक फिचर Extend Unlock म्हणजे स्मार्ट लॉकसारखं फिचर. तुमच्या घरासारख्या विश्वासू ठिकाणी फोन अनलॉक ठेवा.

कसं कराल?

सेटिंग्स > सिक्योरिटी > अधिक सिक्योरिटी आणि प्रायव्हसी > Extend Unlock > तुमचं घर किंवा विश्वासू ठिकाण जोडा.

5. आपत्कालीन वैद्यकीय माहिती सेव्ह करा तुमचं रक्तगट, ऍलर्जीसारखी आवश्यक माहिती आपत्कालीन परिस्थितीत त्वरित उपलब्ध असणं महत्वाचं आहे. Android तुम्हाला ही माहिती सेव्ह करण्याची सुविधा देतो.

कसं कराल?

सेटिंग्स > सेफ्टी आणि इमर्जन्सी > मेडिकल माहिती. इथे तुमची महत्वाची माहिती भरा, जी आपत्कालीन परिस्थितीत लॉक असतानाही ऍक्सेस केली जाऊ शकते.

हे लपलेले Android फिचर्स वापरून तुमच्या स्मार्टफोनला तुमचा पर्सनल असिस्टेंट बनवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT