Anthropic Launches Claude 3.5 Sonnet AI Model
Anthropic Launches Claude 3.5 Sonnet AI Model esakal
विज्ञान-तंत्र

AI Model Launch : चॅट जीपीटी आणि जेमिनीचे दिवस संपले? 'हे' नवीन AI मॉडेल देणार टक्कर,जाणून घ्या

Saisimran Ghashi

AI Model : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात मोठी प्रगती होत आहे. मोठमोठ्या कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात उतरत आहेत आणि प्रगती करत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AIचा वापर करून आपले जीवन आणि कार्यामध्ये सुधारणा करत आहोत.

अश्यातच अँथ्रोपिक या अमेरिकन कंपनीने ‘क्लॉड ३.५ सॉनेट’ (Claude 3.5 Sonnet) नावाच्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा मॉडेल (AI Model) विकसित केला आहे. ही ए.आय. अधिक सक्षम आहे आणि पूर्वीच्या मॉडेल्सपेक्षा दुप्पट वेगवान आणि अधिक कार्यक्षम आहे.

Claude 3.5 Sonnet हे आपल्याला गुगलच्या ‘Gemini1.5Pro’ आणि ओपनएआयच्या ‘GPT4o’ पेक्षाही वेगळं आहे. हे इतकं प्रगल्भ आहे की ते कोड लिहिणं, त्यातल्या चुका काढणं आणि अगदी विनोदही किंवा क्लिष्ट सूचना समजून घेऊ शकते. त्याचबरोबर हे मॉडेल एखाद्या अपूर्ण प्रतिमेतील मजकूर वाचून त्याचा अर्थ समजावून सांगू शकतो. म्हणजेच आपण घाईघाईतं घेतलेल्या फोटोतल्या पोस्टरमधला मजकूर वाचून तो आपल्याला सांगू शकतो.

असंख्य क्षेत्रात क्रांती घडवून आणणारे हे मॉडेल ग्राहकसेवा, माहिती शोधणे, आणि अगदी एखाद्या वेबपेजची निर्मिती करण्यासारखी कामेही सहजतेने पार पाडू शकते. भारतात तयार झालेल्या या ए.आय. मॉडेलमुळे भविष्यात जग अधिक सुलभ आणि कार्यक्षम होण्याची शक्यता आहे.कृत्रिम बुद्धिमतेच्या जोरावर आता आपली चांगलीच प्रगती होत आहे.

आजवर Gemini आणि GPT लोकांमध्ये जास्त फेमस होतं.पण आता या दोन्ही आघाडीच्या AI कंपन्यांना टक्कर देण्यासाठी Claude 3.5 Sonnet सज्ज झाली आहे असं वाटत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cow Milk Rate: दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; प्रतिलिटर 35 रुपये दर जाहीर

Ladaki Bahin Scheme: महिलांच्या मागणीनंतर 'लाडकी बहीण' योजनेला मुदतवाढ! अजित पवारांची सभागृहात घोषणा

Hathras stampede: सत्संगातील मृतदेहांचा खच पाहून आला हृदयविकाराचा झटका, जवानाचा जागेवरच मृत्यू...

IPL 2025 Auction : रिटेंशनवरून कोणताही तोडगा नाही; खेळाडू संख्येवरून फ्रेंचायजीं एकमेकांशीच भिडले

Hathras stampede: हाथरसमध्ये हाहाकार! "माझी मुलगी कुठेच सापडली नाही", आईची शोधाशोध...वाचा प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT