आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात कित्येक दशकांपासून पृथ्वी आणि ब्रह्मांडबाबत रिसर्च सुरू आहे. तरीही शास्त्रांज्ञांचे मत आहे की, या अजूनही असे खूप काही आहे ज्याचा शोध घेणे बाकी आहे. दरम्यान शास्रज्ञांना आपल्या जगाबाबत खूप काही माहित आहे. पण आता आपल्या जगापेक्षा अगदी उलट असे एक जग अस्तित्वात आहे, यावर शास्र्ज्ञांचा हळू हळू विश्वास बसत आहे. (Anti-universe where time runs backward could be real, scientists say)
न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, जर्नल ऑफ फिजिक्समध्ये Anti Universe सिद्धांताबाबत सविस्तर माहिती दिली आहे. यामागे सामान्य भौतिकशास्त्राच्या( Physics)संकल्पनेवर आधारित सिद्धांत असून त्याला सीपीटी(CPT) म्हणून ओळखले जाते. हे जग फक्त आपल्या पृथ्वीजवळच(Earth) असू शकते. संशोधनानुसार, हे जग भौतिकशास्त्राच्या दृष्टीने आपल्या जगाच्या पूर्णपणे विरुद्ध असेल.
उदाहरणार्थ, आपण ज्या पद्धतीने वेळेची गणना करतो, वेळ येथे अगदी उलट असेल. शास्त्रज्ञ या रहस्यमय समांतर जगावर आणखी संशोधन करत आहेत, कारण त्यांचाही Theory of Anti Universe वर विश्वास आहे. शास्त्रज्ञही आपल्यासारखं जग असण्याची शक्यता नाकारत नाहीत की, ''आपल्या जगाप्रमाणे एक असे जग असेल जिथे काळ उलट्या दिशेने धावत असेल.''
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, ''Theory of Anti Universe मूलभूत सममितीवर अवलूंब आहे. या सिद्धांतावर काम करताना Dark Matter स्पष्ट केले जाऊ शकते. संशोधकांचे असेही म्हणणे आहे की, या जगामध्ये न्युट्रान डाव्या बाजुने फिरत असतील. या जगाचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी शास्त्रज्ञ मास न्यूट्रॉनची चाचणी घेत आहेत. जर प्रयोगामध्ये ते यशस्वी झाले तर दुसऱ्या जगाचे असित्त्व सिद्ध होईल. या सिद्धांताची मुख्य गोष्ट ही आहे की आपल्या जगाप्रमाणे त्या जगामध्ये गुरुत्वाकार्षण शक्ती सापडणार नाही, त्यामुळे तिथे सर्वा काही उलटे म्हणजे रिवर्स मोडमध्ये सूरू असेल.''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.