अंतराळातून कित्येक लघुग्रह प्रवास करत असतात. यामधील कित्येक लघुग्रह पृथ्वीला धडकण्याची देखील शक्यता असते. असाच एक विशाल लघुग्रह आज (25 ऑक्टोबर) पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. नासाने याबाबत माहिती दिली आहे.
हा लघुग्रह अपोलो ग्रुप अॅस्टेरॉईडपैकी एक आहे. याचं नाव Asteroid 2023 UF6 असं आहे. एका मोठ्या विमानाच्या आकाराचा हा लघुग्रह तब्बल 55,243 किलोमीटर प्रतितास वेगाने पृथ्वीच्या जवळून जाईल. पृथ्वीपासून हा सुमारे 30 लाख किलोमीटर दूरून निघून जाणार आहे. याचा आकार आणि पृथ्वीपासूनचे अंतर पाहता हा लघुग्रह धोकादायक नसल्याचं नासाने स्पष्ट केलं आहे.
पृथ्वीच्या जवळ असणाऱ्या लघुग्रहांच्या एका समूहाला 'अपोलो ग्रुप' असं नाव देण्यात आलं आहे. 1862 Apollo या मोठ्या लघुग्रहाच्या नावावरुन संपूर्ण समूहालाच ते नाव देण्यात आलं आहे. जर्मन खगोलशास्त्रज्ञ कार्ल रेईनमथ यांनी 1930 साली अपोलो लघुग्रहाचा शोध लावला होता.
नासाने दिलेल्या माहितीनुसार, हा उपग्रह यानंतर भविष्यात हा लघुग्रह पुन्हा एकदा पृथ्वीजवळून जाईल. 22 एप्रिल 2028 रोजी पृथ्वीपासून सुमारे सात कोटी किलोमीटर अंतरावरुन हा लघुग्रह जाऊ शकतो.
दुसरीकडे, 2175 ते 2195 या सालादरम्यान पृथ्वीच्या जवळून बेन्नू नावाचा एक महाकाय लघुग्रह जाऊ शकतो. हा लघुग्रह पृथ्वीला धडकण्याचीही शक्यता आहे. त्यामुळेच याला नष्ट करण्याच्या दृष्टीने नासाने योजना आखण्यास सुरुवात केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.