Apple Event 2023 Wonderlust Event eSakal
विज्ञान-तंत्र

Apple Event 2023 : नवीन आयफोन, अ‍ॅपल वॉच, नवी ओएस.. अ‍ॅपलच्या इव्हेंटमध्ये काय काय झालं लाँच? जाणून घ्या

Wonderlust Event : अ‍ॅपलचा वाँडरलस्ट इव्हेंट मंगळवारी पार पडला.

Sudesh

अ‍ॅपलचा वाँडरलस्ट इव्हेंट मंगळवारी पार पडला. 12 सप्टेंबर रोजी रात्री 10.30 वाजता या इव्हेंटला सुरुवात झाली. यानंतर दीड तासांमध्ये कंपनीने कित्येक मोठ्या घोषणा केल्या. यावेळी अ‍ॅपलने कोणती उत्पादनं लाँच केली हे पाहूया..

आयफोन 15 सीरीज

अ‍ॅपलच्या नव्या आयफोनची संपूर्ण जगभरातील फॅन्सना उत्सुकता लागली होती. या सीरीजमधील चार मॉडेल iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15Pro Max यावेळी लाँच करण्यात आले. जुन्या मॉडेल्सच्या तुलनेत यामध्ये मोठे अपग्रेड दिसून आले.

किंमत

iPhone 15 ची किंमत 399 डॉलर्स आहे, तर iPhone 15 Plus ची किंमत 499 डॉलर्स आहे. iPhone 15 Pro मॉडेलची किंमत 999 डॉलर्स आहे. या तीनही किंमती 128GB स्टोरेज व्हेरियंटच्या आहेत. तर iPhone 15 Pro Max मॉडेलच्या 256GB व्हेरियंटची किंमत 1,199 डॉलर्स एवढी आहे.

यूएसबी-सी

कंपनीने केलेली सर्वात मोठी घोषणा ठरली, ती म्हणजे यूएसबी टाईप-सी सपोर्ट. नव्या आयफोन-15 सीरीजमधील सर्व मॉडेल्स आता USB-C चार्जिंगला सपोर्ट करतील. म्हणजेच टाईप-सी असणाऱ्या कोणत्याही जुन्या अँड्रॉईड चार्जरने यूजर्स हे नवे आयफोन चार्ज करू शकणार आहेत.

अ‍ॅपलने आपल्या एअरपॉड्स प्रो (2nd जनरेशन) साठी टाईप-सी सपोर्ट करणारी चार्जिंग केस देखील लाँच केली आहे. तसंच ज्यांच्याकडे लाईटनिंग चार्जर आणि चार्जिंग केबल आहे, त्यांच्यासाठी अ‍ॅपलने यूएसबी-सी टू लाईटनिंग अडॅप्टरही लाँच केला आहे.

अ‍ॅपल वॉच

अ‍ॅपलने आपल्या स्मार्टवॉच सीरीजमध्ये दोन नवीन घड्याळांची घोषणा केली. यामध्ये अ‍ॅपल वॉच सीरीज 9 आणि अ‍ॅपल वॉच अल्ट्रा 2 याचा समावेश होता. यामध्ये नवीन S9 चिप वापरण्यात आली आहे. दोन्ही वॉचेसच्या सॉफ्टवेअरमध्ये भरपूर अपडेट्स आणि नवीन फीचर्स देण्यात आले आहेत.

स्मार्ट जेस्चर

अ‍ॅपलच्या या स्मार्ट वॉचेसमध्ये एक नवीन खास फीचर देण्यात आलं आहे. याचा फीचरमुळे एका हाताने या वॉच वापरता येतील. आपल्या दोन्ही नव्या घड्याळांमध्ये कंपनीने डबल टॅप हे स्मार्ट जेस्चर दिलं आहे. यामुळे ज्या हातात ही वॉच घातली आहे, त्या हाताचं पहिलं बोट अंगठ्यावर डबल टॅप करून तुम्ही वॉचला कमांड देऊ शकाल.

आय क्लाऊड

अ‍ॅपलने या इव्हेंटमध्ये घोषणा केली, की iCloud+ आता 6TB आणि 12TB स्टोरेज ऑप्शनसोबत उपलब्ध होणार आहे. यामुळे यूजर्सना अधिक फाईल्स आणि डेटा सेव्ह करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kashinath Date: पारनेरमध्ये लंकेंच्या गडाला सुरुंग लावणारे काशिनाथ दाते कोण? काय होती रणनीती?

Latest Marathi News Updates : इव्हीएमविरोधात लढाईसाठी विरोधकांची रणनीती

Weight Gain Problem : मुलांपासून प्रौढांमध्ये लठ्ठपणामुळे वाढती समस्या, आरोग्यावरील गंभीर परिणाम आणि उपाय...जाणून घ्या

Ahilyanagar Crime : पाळीव 'पोपट' मारला; तिघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा, तीन महिन्याच्या शिक्षेसह 500 रूपये दंड

Maharashtra CM : महाराष्ट्रात बिहार पॅटर्न का लागू होऊ शकत नाही? ही आहेत ५ मोठी कारणे

SCROLL FOR NEXT