iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max ची घोषणा झाली आहे. 79,900 रुपयांपासून पुढे असणार आहे.
ॲपलचा ग्लोटाइम लाँच इव्हेंट संपला आहे. ॲपल ग्लोटाइम इव्हेंटमध्ये 3 खास प्रॉडक्ट लाँच झाले आहेत. या इवेंटमध्ये ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी iPhone 16,Apple Watch Series 10,Apple AirPods 4 या तीन मुख्य प्रॉडक्ट लॉंचची घोषणा झाली आहे.
iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro स्मार्टफोनची घोषणा सुरू झाली आहे. डार्क ब्लॅक,व्हाइट ब्ल्युसह आणखी एका रंगात उपलब्ध असणार आहे.
iPhone 16 मध्ये 40 मेगा पिक्सेल कॅमेरा कंट्रोल फीचर असणार आहे.
iPhone 16 मध्ये अॅपल इंटेलिजेंसची घोषणा झाली आहे.
iPhone 16 लॉंचला सुरुवात झाली आहे.
Apple AirPods 4 या अपग्रेडेड एअरपॉडची घोषणा सुरू आहे.
Apple Watch Series 10 वरून Apple Watch Ultra मुख्यत्वे ऍथलीट्ससाठी डिझाइन केलेले वॉच आहे.
Apple Watch सीरिज 10 चे फ्रंट क्रिस्टल टिकाऊ, आयनिक ब्लास्टने बनलेला आहे आणि केसच्या बाजूने आणखी खाली ब्रॉड, समोरच्या क्रिस्टलच्या खाली एक खास लुक तयार करतो, हा Appleचा पहिला-वाइड अँगल OLED डिस्प्ले आहे.
Apple Watch Series 10 येथे आहे ‘इट्स ग्लोटाइम’ इव्हेंटमध्ये सादर केले जाणारे पहिले उपकरण Apple Watch Series 10 आहे, ज्यामध्ये 30 टक्के मोठी स्क्रीन आहे.
Apple चा 'इट्स ग्लोटाइम' इव्हेंट आज (9 सप्टेंबर) काही क्षणातच सुरू होत आहे. Apple इव्हेंटमध्ये भारतीय सेलिब्रिटी सिद्धार्थ आणि अदिती राव हैदरी हजार असल्याचे दिसत आहे.
ॲपलचे सीईओ टिम कुक आता कोणत्याही क्षणी मुख्य भाषणासह कंपनीच्या ‘इट्स ग्लोटाइम’ इव्हेंटची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहेत. ते प्रथम कशाबद्दल बोलतील? ते स्टेजवर येतील की पूर्व-रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओतून संवाद असणार आहे,हे पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.
आयफोन 16 लाँच इव्हेंटमध्ये अपग्रेड केलेले कॅमेरे, वॉच 10, एअरपॉड्स 4 आणि iOS 18 लाँच अपेक्षित आहे. ॲपल इव्हेंटची “इट्स ग्लोटाइम” दरवर्षी प्रमाणे थीम अगदी खास आहे. ॲपलचा iPhone 16 लाँच इव्हेंट आज रात्री 10:30 वाजता सुरू होणार आहे
आयफोन 16 लाँच इव्हेंटमध्ये ॲपल इंटेलिजेंस-इन्फ्युज्ड स्मार्टफोन्स, अपग्रेड केलेले कॅमेरे, वॉच 10, एअरपॉड्स 4 लाँच अपेक्षित आहे. Apple चा iPhone 16 लाँच इव्हेंट आज रात्री 10:30 वाजता सुरू होणार आहे, ज्याची घोषणा ‘इट्स ग्लोटाइम’ आहे.
Apple चा 'इट्स ग्लोटाइम' इव्हेंट आज (9 सप्टेंबर) आहे, ज्यामध्ये Apple Watch Series 10, Apple AirPods 4 आणि इतर उपकरणांसह iPhone 16 लाँच होण्याची शक्यता आहे.
iPhone 16 चा लॉन्च इव्हेंट भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता सुरू होणार असून ॲपलच्या वेबसाइट आणि ॲपल टीव्ही ॲपवर तुम्ही हा कार्यक्रम लाईव्ह पाहू शकता. यासोबतच या कार्यक्रमाचे यूट्यूब चॅनलवर लाईव्ह स्ट्रिमिंगही होणार आहे. आयफोन 16 हा चार मॉडल्स आयफोन 16, 16 प्लस, 16 प्रो आणि 16 प्रो मॅक्ससह लाँच होण्याची शक्यता आहे.
Apple आज 9 सप्टेंबर रोजी आपली नवीन iPhone 16 मालिका जागतिक स्तरावर लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. परंतु लॉन्चची तारीख आणि वेळ जाहीर होण्याआधीच, आयफोन 16 सीरिजच्या स्पेक्स आणि किंमतीबद्दल अफवा पसरल्या आहेत. मात्र, ॲपलने याबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.