Apple Camera Module : मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत जगभरातील कित्येक कंपन्या भारतात येत आहेत. अगदी टेक जगतातील दिग्गज कंपनी अॅपलने देखील आयफोनचं उत्पादन भारतात सुरू केलं आहे. यातच आता आयफोनच्या कॅमेऱ्याचं उत्पादन देखील भारतात शक्य होणार असल्याचं दिसत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अॅपल कंपनी सध्या कॅमेरा मॅन्युफॅक्चरिंगसाठी टाटा ग्रुपच्या टायटन कंपनीशी आणि मुरुगप्पा ग्रुपशी चर्चा करत आहे. सध्या आयफोनचे कॅमेरे हे चीनमध्ये तयार होतात. तिथून ते आयात करावे लागतात. मात्र, भारतात याचं उत्पादन सुरू झाल्यास चीनवर अवलंबून रहावं लागणार नाही.
भारतात सध्या मोठ्या प्रमाणात आयफोनचं उत्पादन घेतलं जातं. 2023-24 या वर्षात भारतातून होणारी आयफोन निर्यात दुप्पट झाली आहे. भारतातून सगळ्यात जास्त निर्यात अमेरिकेत केली जात आहे. मात्र सध्या भारतात आयफोनच्या कॅमेरा मॉड्यूलचा सप्लायर उपलब्ध नाही. मुरुगप्पा किंवा टायटनसोबत पुढील पाच ते सहा महिन्यांमध्ये अॅपलची डील होण्याची शक्यता आहे.
इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, या दोन्ही कंपन्यांकडे प्रिसीजन पार्ट्स बनवण्याचा अनुभव आहे. टायटन कंपनी आपल्या घड्याळांसाठी आणि दागिन्यांसाठी असे लहान पार्ट्स बनवते. तर मुरुगप्पा ग्रुप देखील 100 वर्षांपेक्षा अधिक काळापासून इंडस्ट्रीमध्ये आहे. 2022 साली मुरुगप्पा ग्रुपने कॅमेरा मॉड्यूल बनवणाऱ्या मोशाइन इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमध्ये शेअर्स विकत घेतले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.