विज्ञान-तंत्र

स्वस्तात खरेदी करा iPhone; जाणून घ्या Amazon-Flipkart ची खास ऑफर

सकाळ डिजिटल टीम

तुम्ही देखील Apple iPhone खरेदी करण्याचा विचार करत आहात का? Amazon आणि Flipkart या वेबसाइट्स स्मार्टफोनवर मोठी सूट देत आहेत. ऑफर अंतर्गत, iPhone वर डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरसह खरेदी केला जाऊ शकतो. आज आपण दोन्ही वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल जाणून घेणार आहोत.

Apple चा iPhone 11 हा भारतात लॉंच झाला तेव्हा खूप लोकप्रिय स्मार्टफोन होता. आयफोन 11 हा 2019 मध्ये देशात 64,900 रुपयांच्या किंमतीला लॉन्च झाला होता आणि आता भारतात 49,900 रुपयांना विकला जात आहे. आता, लॉन्च झाल्यापासून त्याची किंमत थोडीशी कमी झाली असली तरी, भारतातील बहुतेक स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी 49,900 ही किंमत अजूनही महाग आहे. मात्र Flipkart आणि Amazon सारखे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहेत ज्यांच्या मदतीने वापरकर्त्यांना कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदी करता येणे शक्य होते, खरेदीदारांकडे एक्सचेंज ऑफर सोबत जु इतर कॅशबॅक आणि बँक कार्डांवर ऑफरचा लाभ देखील घेता येतो.

Amazon

Amazon India वर, ग्राहक त्यांच्या जुन्या स्मार्टफोन एक्सचेंज केल्यावर 15,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळवू शकतात. जर त्यांच्या जुन्या स्मार्टफोनची किंमत सुमारे 15,000 रुपये असेल तर आयफोन 11 ची किंमत Amazon वर 34,900 रुपयांपर्यंत खाली येईल. याशिवाय, आयसीआयसीआय बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड, कोटक बँक क्रेडिट कार्ड आणि एसबीआय क्रेडिट कार्ड्सवर 4,000 रुपयांची इस्टंट सूट आहे, याचा अर्थ, जर खरेदीदार या सर्व ऑफर्सचा लाभ घेऊ शकत असेल तर हा स्मार्टफोन Amazon वर 30,900 रुपयांच्या किमतीत खरेदी केला जाऊ शकतो,

फ्लिपकार्ट (Flipkart)

Flipkart वर देखील, iPhone 11 ची किंमत 49,900 रुपये आहे. ई-कॉमर्स कंपनी तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या एक्सचेंजवर 18,850 रुपयांची एक्सचेंज ऑफर देत आहे, म्हणजे तुम्ही Flipkart वर 31,050 रुपयांपेक्षा कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदी करू शकता. दुर्दैवाने, एक्सचेंज ऑफर व्यतिरिक्त कोणत्याही बँक ऑफर किंवा इतर कॅशबॅक डील उपलब्ध नाहीत, परंतु खरेदीदार 'Flipkart Axis Bank' क्रेडिट कार्ड वापरल्यास 5 टक्के कॅशबॅकचा लाभ घेऊ शकतात.

सप्टेंबर 2019 मध्ये लाँच झालेला, iPhone 11 मध्ये 6.1-इंचाचा रेटिना डिस्प्ले नॉचसह येतो. हा स्मार्टफोन Apple ला A13 बायोनिक चिप सपोर्ट दिला आहे आणि 128GB पर्यंत इंरनल स्टोरेजसह येतो. स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये दोन 12-मेगापिक्सेल वाइड अँगल शूटर आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT