तंत्रज्ञान दररोज बदलत आहे, दररोज नवीन डिव्हाइस लॉंच होत आहेत. आता Apple कंपनी असा आयफोन (iPhone) घेऊन येत आहे, ज्यामध्ये सिमकार्ड (SIM Card) टाकण्यासाठी कोणताही स्लॉट नसेल. हा आयफोन ई-सिमवर (e-SIM) चालेल. Apple कंपनी iPhone 15 सीरीजमध्ये हे फीचर अपग्रेड करू शकते. मात्र, या फीचर फोनसाठी तुम्हाला काही काळ वाट पाहावी लागणार आहे. असे सांगितले जात आहे की, आयफोन 15 सीरीज 2023 मध्ये लॉन्च होईल. iPhone 15 हा सिम कार्ड स्लॉटशिवाय येणारा पहिला फोन असू शकतो.
नवीन फोनमध्ये येणार दोन ई-सिम
Apple Inc ने आपला iPhone XR, iPhone XS आणि iPhone XS Max e-SIM सह लॉन्च केला आहे. यानंतर अॅपल आता आयफोनमधून फिजिकल सिम कार्ड स्लॉट काढून टाकण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. ब्राझिलियन पब्लिकेशन ब्लॉगनुसार, Apple iPhone 2023 Pro मॉडेल म्हणजेच iPhone 15 Pro मध्ये फिडीकल सिम कार्ड स्लॉट नसेल आणि कनेक्टिव्हिटीसाठी पूर्णपणे ई-सिम तंत्रज्ञानावर आधारित असेल. या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की Apple बर्याच काळापासून यावर काम करत आहे. नवीन फोनमध्ये दोन ई-सिम वापरता येतील.
अॅपलने ई-सिम तंत्रज्ञान वापरल्यास या सीरीजचे फोन जगातील इतर देशांमध्ये विकता येणार नाहीत, असेही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. कारण सध्या अनेक देशांमध्ये ई-सिम तंत्रज्ञान वापरणे सोपे ठरणार नाही.
ई-सिम काय आहे
रिलायन्स जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल भारतात ई-सिमचे फीचर देत आहेत . दूरसंचार कंपन्यांद्वारे ई-सिम ओव्हर-द-एअर एक्टिव्हेट केले जाते. ई-सिम हे मोबाईल फोनमध्ये इंस्टॉल केलेले व्हर्च्युअल सिम कार्ड आहे. हे अगदी फिजीकल सिम कार्ड सारखे काम करते. जर तुम्ही ई-सिमसाठी अर्ज केला तर तुम्हाला फोनमध्ये कोणतेही कार्ड घालावे लागणार नाही.
ई- सिमचे फायदे
ई-सिमची चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही ऑपरेटर बदलता तेव्हा तुम्हाला सिम कार्ड बदलण्याची गरज नाही. तसेच फोन जास्त गरम झाल्यावर किंवा पाण्याने भिजल्यावर ई-सिमवर कोणताही परिणाम होत नाही. बरेच वापरकर्ते त्यांचे सिम कार्ड काही काळानंतर व्यवस्थित काम करत नसल्याबद्दल तक्रार करतात, परंतु ई-सिमच्या बाबतीत असे होत नाही. हे व्हर्च्युअल सिम आहे, त्यामुळे या सगळ्या बाबींची कळजी करावी लागत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.