iPhone 15 Series Launch eSakal
विज्ञान-तंत्र

iPhone 15 : अ‍ॅपलची 'आयफोन-15' सीरीज लाँच; मिळणार USB-C सपोर्ट! जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

Apple Event 2023 : अ‍ॅपलचा नवा आयफोन-15 लाँच झाला आहे.

Sudesh

अ‍ॅपलने आपली आयफोन-15 सीरीज लाँच केली आहे. अ‍ॅपलचा वाँडरलस्ट इव्हेंट आज (12 सप्टेंबर) पार पडला. या इव्हेंटमध्ये अ‍ॅपलने आपली नवी वॉच सीरीज, ओएस आणि आयफोन लाँच केले. यामध्ये iPhone 15 सीरीजमधील चार मॉडेल लाँच करण्यात आले. यात iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max यांचा समावेश आहे.

iPhone 15 मध्ये 6.1 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. तर, iPhone 15 Plus फोनमध्ये 6.7 इंच मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. पाच रंगांमध्ये हे फोन लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये iPhone 14 च्या तुलनेत दुप्पट ब्राईटनेस देण्यात आली आहे. यामध्ये स्क्रीनवर नॉज ऐवजी डायनॅमिक आयलँड फीचर देण्यात आलं आहे.

किती आहे किंमत?

अ‍ॅपल आयफोन 15 ची किंमत 799 डॉलर्स एवढी असणार आहे. तर, आयफोन 15 प्लसची किंमत 899 डॉलर्स एवढी असणार आहे. या किंमती 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटच्या आहेत. हे फोन पिंक, येलो, ग्रीन, ब्लू आणि ब्लॅक रंगांमध्ये उपलब्ध असतील. विशेष म्हणजे, याचे रंग हे मागच्या बाजूला असणाऱ्या काचेमध्ये एम्बेडेड असतील.

कॅमेरा फीचर्स

आयफोन 15 आणि आयफोन 15 प्लस या स्मार्टफोनमध्ये ड्युअल बॅक कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील प्रायमरी कॅमेरा हा 48 मेगापिक्सलचा आहे. यात 26mm फोकल लेंथ, 2-मायक्रॉन क्वाड पिक्सेल सेन्सर आणि 100% फोकस पॉइंट देण्यात आला आहे. यामध्ये नवीन कॅमेरा सिस्टीम देण्यात आलेली आहे. यातील नाईट मोडमध्ये नवीन अपडेट देण्यात आलं आहे.

टाईप-सी चार्जिंग

या आयफोनमध्ये ऑल-डे बॅटरी लाईफ देण्यात आली आहे. तसेच हे दोन्ही आयफोन यूएसबी-सी चार्जिंगला सपोर्ट करतील. यामुळे कोणत्याही टाईप-सी चार्जरने यूजर्स आयफोन चार्ज करू शकणार आहेत.

प्रो व्हर्जन्स

आयफोन 15 च्या दोन्ही प्रो व्हर्जन्समध्ये सर्वात थिन बेझल्स देण्यात आले आहेत. यामध्ये नवीन A17 Pro चिप असणार आहे. या दोन्ही मॉडेल्समध्ये देखील यूएसबी-सी टाईप केबल वापरता येणार आहे. यामध्ये म्युट बटणाच्या जागी नवीन अ‍ॅक्शन बटण मिळणार आहे. आयफोन 15 प्रो या फोनमध्ये 6.1 इंच स्क्रीन देण्यात आलेली आहे. तर प्रो प्लस या मॉडेलमध्ये 6.7 इंच स्क्रीन मिळेल. हे आतापर्यंतचे सर्वात हलके प्रो आयफोन असणार आहेत.

कॅमेरा सेटअप

iPhone 15 प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेलमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळणार आहे. यामध्ये 24 mm, 28mm आणि 35mm अशा तीन फोकल लेंथ मिळतील. तसंच आतापर्यंतचं सर्वात बेस्ट 5x झूम यामध्ये मिळणार आहे. मॅक्रो फोटोग्राफी, पोर्टेट्र फोटोग्राफी आणि नाईट फोटोग्राफीसाठी हा कॅमेरा उत्तम असणार आहे.

व्हिडिओच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, नवीन आयफोन 15 प्रो मध्ये यूजर्स 4K 60FPS एवढ्या हाय क्वालिटीचे व्हिडिओ रेकॉर्ड करू शकणार आहेत.

किंमत आणि कलर्स

'आयफोन 15 प्रो'च्या 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 999 डॉलर्स एवढी आहे. तर, 'आयफोन-15 प्रो मॅक्स'च्या 256GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 1,199 डॉलर्स एवढी असणार आहे. हे मॉडेल्स टायटेनियम व्हाईट, नॅचरल टायटेनियम, टायटेनियम ब्लू आणि टायटेनियम ब्लॅक या चार रंगांमध्ये उपलब्ध असतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Crash: निफ्टी आणखी 1,000 अंकांनी घसरू शकतो; शेअर बाजारात सातत्याने का कोसळत आहे?

आज नाही जन्मदिन नाही पुण्यतिथी तरीही गुगलने का बनवला सुप्रसिद्ध गायक केके यांचं डुडल ?

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीला सुरुवात

Firing On School Van: उत्तर प्रदेशात देशाला हादरवणारी घटना! स्कूल व्हॅनवर तरुणांकडून गोळीबार

Chh. Sambhajinagar Assembly Election 2024 : छत्रपती संभाजीनगर ‘वंचित’ मतांमध्येही आघाडी घेणार का?

SCROLL FOR NEXT