Budget Impact Smartphone Industry : भारतात तयार होणार्या मोबाईल फोनचा आकडा जवळपास ९९ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे आयात केलेल्या मोबाईल फोनवरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतला आहे. काल 2024-25 वर्षाचे बजेट सादर करताना त्यांनी मोबाईलचे दर,मोबाईलच्या पार्ट्सचे दर आणि चार्जरचे दर कमी होणार असल्याचे सांगितले. यामुळे आयात कर कमी झाल्याने ॲपलच्या आयफोन प्रो (iphone pro) आणि गुगलच्या पिक्सल (Google Pixel) सारख्या महागड्या फोनच्या किमती थोड्या कमी होण्याची शक्यता आहे.
“मोबाईल फोनच्या देशांतर्गत उत्पादनात गेल्या सहा वर्षांत तीनपट वाढ झाली आहे आणि निर्यातीमध्ये शंभरपट वाढ झाली आहे. त्यामुळे भारतीय मोबाईल फोन उद्योग आता परिपक्व झाला आहे. ग्राहकांच्या हितासाठी मी आता मोबाईल फोन, मोबाईल पीसीबीए (प्रिंटेड सर्किट बोर्ड असेंब्ली) आणि मोबाईल चार्जरवरील मूलभूत सीमाशुल्क शुल्क (BCD) १५ टक्क्यांवर कमी करण्याचा प्रस्ताव करते,” असे अर्थमंत्रींनी अर्थसंकल्पीय भाषणात म्हटले आहे. पूर्वी हा दर २० टक्के होता आणि हा दर भारतात स्मार्टफोनचे स्थानिक उत्पादन वाढवण्यासाठी आणला होता.
कंपन्यांनी ग्राहकांना ही सूट दिली तर आयात केलेल्या आयफोन प्रोच्या किमतीत ३,००० ते ४,००० रुपये आणि गुगल पिक्सलच्या किमतीत २,००० ते ३,००० रुपये कमी होण्याची शक्यता आहे, असे काउंटरपॉइंटचे व्हीपी नील शाह यांनी सांगितले.
शाह यांनी पुढे सांगितले की, या निर्णयामुळे आयात बचत करून ॲपलला ३० ते ५० दशलक्ष अमेरिकन डॉलरचा फायदा होऊ शकतो. सध्या ॲपल आपले बहुतांश आयफोन भारतात बनवित असला तरी, तेथे उत्पादन-लिंक्ड प्रोत्साहन (PLI) योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, कंपनी अजूनही प्रो आवृत्त्या आयात करते.
गुगल आता आपले पिक्सल फोन भारतात बनवण्याचा विचार करत असले तरी, त्यांची बाजारपेठ वाटणी अत्यल्प असूनही ते अद्यापही आयात केले जात आहेत. कंज्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अॅप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि डिक्सॉनचे अध्यक्ष सुनील वाचाणी यांनी सांगितले की, आयात शुल्कातील कपात स्थानिक मोबाईल फोन उत्पादनावर कोणताही परिणाम करणार नाही.
“देशात संपूर्ण इकोसिस्टम इतके मजबूतरित्या बांधले गेले आहे की आम्हाला आयात केलेल्या पूर्ण मोबाईल फोनपासून कोणताही धोका दिसत नाही. तसेच, भारतात PLI चा सतत लाभ होत आहे. आमच्या मते यामुळे स्मार्टफोनच्या आयातीत लक्षणीय वाढ होणार नाही,” असे वाचाणी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.