iPhone Sakal
विज्ञान-तंत्र

iPhone factory: Apple चीनला देणार मोठा झटका, आयफोन फॅक्ट्री होणार बंद; भारताचा फायदा?

चीनमध्ये वारंवार होणाऱ्या लॉकडाउनला वैतागून टेक कंपनी Apple चीनमधील आयफोन निर्मितीचा प्लांट बंद करण्याची शक्यता आहे.

Akash Ubhe

iPhone factory in China: दिग्गज टेक कंपनी Apple लवकरच चीनला मोठा झटका देण्याची शक्यता आहे. कंपनी आपल्या चीनमधील प्रोडक्शन प्लांटला इतर देशात शिफ्ट करण्याच्या तयारीत आहे. अ‍ॅपलने इतर देशात प्लांट शिफ्ट केल्यास चीनला मोठा फटका बसू शकतो. तर याचा फायदा भारताला होऊ शकतो. करोना व्हायरस महामारीमुळे पुन्हा करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे चीनमध्ये नागरिकांकडून आंदोलन केले जात आहे.

चीनमधील Zhengzhou 'iPhone City' प्लांटच्या कर्मचाऱ्यांकडून लॉकडाउनविरोधात आंदोलन केले जात आहे. आंदोलनादरम्यान कर्मचारी व सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये झटापट झाल्याचे व्हीडिओ समोर आले होते. हे घटनेनंतर कंपनी चीनमधील प्लांट इतर देशांमध्ये शिफ्ट करण्याचा तयारीत आहेत. कंपनी आपला प्लांट भारत अथवा व्हिएतनाम या देशात शिफ्ट करू शकते.

हेही वाचा - वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

प्लांटमध्ये ३ लाख कर्मचारी करतात काम

अ‍ॅपल चीनच्या या प्लांटवर अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. Foxconn टेक्नोलॉजी ग्रुपद्वारे हा प्लांट चालवला जातो. चीनच्या Zhengzhou येथील फॉक्सकॉनच्या फॅक्ट्रीमध्ये जवळपास ३ लाख कर्मचारी काम करतात. या फॅक्ट्रीमध्ये आयफोन व्यतिरिक्त अ‍ॅपलच्या इतरही प्रोडक्ट्सची निर्मिती होते. रिपोर्टनुसार, फॉक्सकॉनच्या या प्लांटमध्ये आयफोन प्रो लाइनअपचे ८५ टक्के उत्पादन होते.

लॉकडाउनमुळे कर्मचाऱ्यांचे आंदोलन

चीन कठोरपणे शून्य कोव्हिड धोरणांचा अवलंब करत आहे. करोना व्हायरसचा पुन्हा उद्रेक झाल्यानंतर झेंगझोऊमध्ये लॉकडाउन लावण्यात आले होते. या लॉकडाउनला वैतागून फॅक्ट्रीमधील अनेक कर्मचाऱ्यांनी आंदोलन, तोडफोन करण्यास सुरुवात केली होती. या दरम्यान सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत कामगारांची झटापट झाल्याचे व्हीडिओ समोर आले होते. याचा फटका आयफोन उत्पादनावर देखील झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT