Apple Intelligence Offer: ॲपलने त्याच्या Apple Intelligence सर्व्हरच्या सुरक्षेसाठी एक विशेष बग बाउंटी प्रोग्राम सुरु केला आहे, ज्यात हॅकिंग करणाऱ्यांना 8 कोटींपेक्षा जास्त बक्षीस जिंकता येईल. लवकरच लॉन्च होणाऱ्या iOS 18.1 अपडेटसह, Apple Intelligence ही AI-आधारित प्रणाली आपल्या वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी आणखी सुरक्षित बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
WWDC 2024 मध्ये Apple Intelligence ची घोषणा करण्यात आली होती, ज्यामध्ये Siri सुधारणांसह नवीन AI सुविधा समाविष्ट आहेत. कंपनीने आपल्या प्रायव्हेट क्लाऊड कम्प्युट (PCC) प्लॅटफॉर्ममधील सुरक्षेच्या त्रुटी शोधण्यासाठी हॅकर्स आणि संशोधकांना आमंत्रित केले आहे. हॅकर्सना सर्व्हरमध्ये प्रवेश मिळाल्यास, त्यांना बग शोधल्याबद्दल मोठं बक्षीस दिलं जाणार आहे.
बग बाउंटी अंतर्गत तीन मुख्य श्रेण्या तयार करण्यात आल्या आहेत.
1. डेटा लिक: चुकीच्या सेटिंग्जमुळे डेटा लिक होत असल्यास, Apple 250,000 डॉलरपर्यंतचे बक्षीस देईल.
2. बाह्य प्रवेश: हॅकर्सना जर PCC मध्ये अनधिकृत प्रवेश मिळवता आला, तर त्यांना 1 मिलियन डॉलरपर्यंतची रक्कम दिली जाईल.
3. अंतर्गत प्रवेश: या श्रेणीमध्ये, हॅकर्सना अंतर्गत अधिकारांमध्ये वाढ करून महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्यासोबत 150,000 डॉलरचं बक्षीस जिंकता येईल.
ॲपलने आपल्या बग बाउंटी प्रोग्राममध्ये सहभाग घेणाऱ्यांसाठी विशेष संसाधने उपलब्ध करून दिली आहेत. आता खरोखर कुणी हॅकिंग करू शकेल की या स्पर्धेमध्ये ॲपल कंपनी जिंकेल हे पाहणे रोमांचक असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.