Apple October Event 2024 : अॅपलने ऑक्टोबरच्या शेवटी एक मोठा इव्हेंट घेण्याची तयारी केली असून, या इव्हेंटमध्ये कंपनी ४ नवीन प्रॉडक्ट लाँच करण्याची शक्यता आहे. या उत्पादनांची विक्री १ नोव्हेंबरपासून सुरू होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. MacBook आणि iPad Mini सारख्या लोकप्रिय डिव्हाइसच्या अपग्रेडवर सर्वाधिक लक्ष आहे.
तीन वर्षांच्या अंतरानंतर iPad Mini चे नवीन व्हर्जन येण्याची शक्यता आहे. सातव्या जनरेशनचा iPad Mini, शक्तिशाली A18 चिपसेटसह सुसज्ज असेल आणि त्यात Apple Intelligence ची सुविधा मिळेल. या मॉडेलमध्ये 128GB स्टोरेज आणि Apple Pencil Pro साठी सपोर्ट असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तो प्रोफेशनल्स आणि क्रिएटिव्हसाठी खास आकर्षण ठरू शकतो.
MacBook Pro चे 14-इंच आणि 16-इंच व्हेरियंट्स लाँच होण्याची शक्यता असून, यामध्ये M4, M4 Pro आणि M4 Max चिप्सचा समावेश असेल. बेस मॉडेलमध्ये 16GB RAM असू शकतो, जो या श्रेणीतील पहिलाच अपग्रेड असेल. याशिवाय, नवीन MacBook Pro मध्ये स्पेस ब्लॅक रंग आणि अतिरिक्त Thunderbolt पोर्टदेखील असू शकतो, जो पॉवर यूजर्ससाठी उपयुक्त ठरू शकतो.
अॅपल आपल्या Mac Mini च्या डिझाइनमध्येही मोठे बदल करत आहे. हा नवीन Mac Mini छोट्या आकारात आणि फ्रंट-फेसिंग पोर्टसह येऊ शकतो. M4 आणि M4 Pro चिप पर्यायांसह उपलब्ध असलेल्या या मॉडेलमध्ये 16GB RAM असण्याची शक्यता आहे. याशिवाय, या डिव्हाइसमधून USB-A पोर्ट्स काढून टाकले जातील.
iMac चा अपग्रेड तुलनेने छोटा असला तरी त्यात M4 चिपचा समावेश असेल. बेस मॉडेलमध्ये 8GB च्या जागी 16GB RAM मिळण्याची शक्यता आहे. अॅपल आपल्या Magic Keyboard, Mouse आणि Trackpad मध्ये देखील USB-C पोर्ट्सचा समावेश करेल, असेही अंदाज आहेत. तरी ही सर्व माहिती लीक्सवर आधारित आहे, त्यामुळे प्रत्यक्षात काय मिळेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.