Apple Watch Case eSakal
विज्ञान-तंत्र

Apple Watch Dispute : अ‍ॅपलने वॉच अल्ट्रा 2 आणि 9 सीरीजची विक्री थांबवली; काय आहे कारण?

Apple Patent Dispute : आता अ‍ॅपलकडे केवळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडे जाण्याचा पर्याय उरला आहे.

Sudesh

Apple to Stop Selling Watch Ultra 2 : अ‍ॅपल कंपनीने काही दिवसांपूर्वीच वॉच अल्ट्रा 2 आणि वॉच 9 सीरीज लाँच केले होते. मात्र आता अमेरिकेत या दोन्ही गोष्टींची विक्री थांबवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. लवकरच अमेझॉन आणि इतर वेबसाईट्सवरुन याची विक्रीही थांबवण्यात येईल. पेटंटशी संबंधित एका वादामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

काय आहे वाद?

अ‍ॅपल कंपनीच्या Watch Series 9 आणि Watch Ultra 2 या स्मार्टवॉचमध्ये वापरण्यात आलेल्या SpO2 (रक्तातील ऑक्सिजन) सेन्सर्सचे पेटंट हे मॅसिमो कंपनीकडे आहे. याबाबत कोर्टात वाद सुरू असून, इंटरनॅशनल ट्रेड कमिशनने (ITC) यामुळेच अ‍ॅपलच्या या नव्या स्मार्टवॉचच्या विक्री थांबवण्याचा निर्णय दिला आहे.

21 डिसेंबरपासून या स्मार्टवॉचची ऑनलाईन विक्री बंद होणार आहे. तर 24 डिसेंबरपासून दुकानांमध्ये या स्मार्टवॉच विकण्यास बंदी लागू होणार आहे. अर्थात, अ‍ॅपलने या निर्णयाला विरोध दर्शवला असून; याबाबत आपण कायदेशीर मार्ग शोधत असल्याचं स्पष्ट केलं आहे.

अ‍ॅपलकडे काय पर्याय?

मॅसिमो (Masimo) कंपनीने अ‍ॅपल विरोधात यूएस डिस्ट्रिक्ट कोर्टात एक आणि आयटीसीकडे एक असे दोन खटले दाखल केले होते. आयटीसीने तर मॅसिमोच्या बाजूने निर्णय दिला आहे. त्यामुळे आता अ‍ॅपलकडे केवळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडे जाण्याचा पर्याय उरला आहे. हा निर्णय कायम ठेवण्याचा किंवा व्हिटो करण्याचा अधिकार बायडेन यांच्याकडे आहे.

यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी iPhone 4 वरील ITC ने लागू केलेला बॅन रद्द केला होता. मात्र, बायडेन यांनी यापूर्वी EKG टेक्नॉलॉजी बाबत ITC चा अ‍ॅपल कंपनी विरोधातील निर्णय कायम ठेवला होता. त्यामुळे आता ते काय करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

तुमच्या स्मार्टवॉचचं काय?

अ‍ॅपलच्या या नव्या स्मार्टवॉचचे जे युनिट्स विकले गेले आहेत, त्यावर या निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे तुम्ही जर हे वॉच विकत घेतले असतील तर टेन्शन घेण्याची गरज नाही. ग्राहकांकडे असलेल्या अ‍ॅपल वॉच या सामान्यपणे कार्यरत राहतील.

यासोबतच, अमेझॉन किंवा इतर वेबसाईट्सकडे सध्या स्टॉकमध्ये असलेल्या स्मार्टवॉच विकण्याची परवानगी त्यांना असेल. मात्र अ‍ॅपल कंपनी या थर्ड-पार्टी रिटेलर्सना आणखी युनिट्स पुरवू शकणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Border Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, Shami नाहीच; KL Rahulला अभय

Porsche Car Accident : डॉ. तावरेसह हाळनोरविरुद्ध फौजदारी खटला चालणार; राज्य सरकारकडून मंजुरी

South West Nagpur Assembly Election : विरोधकांसाठी आमच्या ‘लाडक्या बहिणी’च पुरेशा; देवेंद्र फडणवीस यांची टीका

Imtiaz Jaleel: "ज्यानं मला पाडलं, त्याला पाडण्यासाठी मी काय करतो बघाच"; इम्तियाज जलील यांचा थेट इशारा

IND A vs AFG A : भारतीय संघाचे लोटांगण; अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत वाईट पद्धतीने हरवले

SCROLL FOR NEXT