Apple TV+ and More in New App Coming to Android Phones and Tablets esakal
विज्ञान-तंत्र

Apple TV in Android : Apple TV बघा Android फोनमध्ये ; चित्रपट, वेब सीरिज आणि बरंच काही

Apple TV App Launch : अँपल टीव्ही अॅप बनणार स्ट्रीमिंग कंटेन्ट हब

सकाळ डिजिटल टीम

New App Launch : Apple कंपनीने Android वापरकर्त्यांसाठी एकआनंदाची बातमी दिलीये. Apple त्यांच्यासाठी एक धमाकेदार ऍप घेऊन येत आहे. कंपनी लवकरच Android स्मार्टफोन आणि टॅब्लेटसाठी त्यांचं Apple TV अॅप लाँच करणार आहे. त्यामुळे आता Android वापरकर्ते Apple TV+ वरील सर्व मूळ मालिकांचा आणि इतर स्ट्रीमिंग कंटेंटचा थेट अॅपवरून आनंद घेऊ शकणार आहेत.

आत्तापर्यंत Apple TV अॅप फक्त iPhone आणि काही निवडक Android स्मार्ट टीव्हीवरच उपलब्ध होते. पण आता कंपनी आपले यूजर्स वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे.अश्यात त्यांनी हे नवीन ऍप लाँच करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हणलं जात आहे. एका रिपोर्टनुसार, Apple या नवीन प्रोजेक्टसाठी सध्या इंजिनिअर्सची नियुक्ती करत आहे.

Apple TV अॅप हे विविध स्ट्रीमिंग कंटेन्टसाठी एक हब म्हणून काम काम करणार आहे. यात Apple TV+ ची मूळ मालिका, चित्रपट आणि माहितीपटांचा समावेश आहे. इतकेच नाही तर, यूजर्स HBO आणि Showtime सारख्या इतर अनेक चॅनेल्सची सदस्यता घेऊ शकतात. यामुळे एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या मनोरंजनाचा आस्वाद घेता येईल.

याशिवाय, अॅपमध्ये तुम्ही चित्रपट आणि मालिका सब्सक्राइब करू शकता किंवा रेंटवर देखील घेऊ शकता. तसेच, फ्राइडे नाईट बेसबॉल आणि MLS सीजनसारखे स्पोर्ट्स कंटेंट देखील यावर उपलब्ध असणार आहे.

आतापर्यंत, ज्या Android वापरकर्त्यांना Apple TV+ वरील मालिका पाहायच्या होत्या किंवा MLS सीजनचा आनंद घ्यायचा होता त्यांना tv.apple.com या वेबसाइटचा वापर करावा लागत होता. आता येणारे हे अॅप गेम चेंजर ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT