41 thousand Year Old Ostrich Egg Fossils esakal
विज्ञान-तंत्र

Archaeological Discovery : शास्त्रज्ञांना सापडल ४१ हजार वर्षांपूर्वीच शहामृगाचं अंड,आकार पाहून व्हाल थक्क,पाहा व्हायरल फोटो

Oldest Ostrich Nest: आंध्र प्रदेशच्या प्रकासम जिल्ह्यातून अत्यंत महत्वाचे पुरातत्वीय साक्ष्य सापडले आहे.

Saisimran Ghashi

Ostrich Egg : जगात अनेक गोष्टींवर हजारो वर्षांपासून संशोधन सुरू आहे. या संशोधनातून अनेक अचंबित करणारे शोध समोर येतात. अश्यात आंध्र प्रदेशच्या प्रकासम जिल्ह्यातून अत्यंत महत्वाचे पुरातत्वीय साक्ष्य सापडले आहे. वडोदरा येथील एम.एस. विद्यापीठातील पुरातत्ववेद्यांच्या संयुक्त संशोधनात जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेच्या सहयोगी संशोधकांना हे यश मिळाले आहे.

पृथ्वीवर अनेक गूढ आहेत, ज्यांचे उत्तर अजूनही मिळालेले नाहीत. या अनुत्तरीत प्रश्नांचा शोध अनेक शास्त्रज्ञ घेत आहेत. असाच एक प्रश्न म्हणजे भारतात मेगाफॉना (४० किलो पेक्षा जास्त वजनाची प्राणी) नष्ट का झाली? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी अनेक पुरातत्ववेद्द्यांचे प्रयत्न सुरु आहेत. याच क्रमात आंध्र प्रदेशमध्ये संशोधकांच्या टीमला जगातील टिकून असलेले ४१ हजार वर्ष जुने शहामृगांचे घर (Nest) सापडले आहे. या घरात ९ ते ११ शहामृगांची अंडी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

यापूर्वी भारतात राजस्थानच्या कटोती येथून ६० हजार वर्ष जुनी शहामृगांची अंडी सापडली होती, जी भारतातील सर्वात जुनी मानली जातात. मात्र, आता सापडलेले हे अवशेष अधिक जुने असून पुरातत्वीयदृष्ट्या खूप महत्वाचे मानले जात आहेत. प्रयोगशाळेत यावर संशोधन करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

शोधकर्ते सांगतात, सामान्यत: शहामृगचे घर हे ९ ते १० फूट रुंद असते. त्यांच्या घरात एका वेळी ३० ते ४० अंडी असू शकतात. मात्र, आंध्र प्रदेशमध्ये सापडलेले हे घर फक्त १ x १.५ मीटरच्या जागेत आहे. या ठिकाणहून सुमारे ३५०० शहामृगांच्या अंड्यांचे तुकडे सापडले आहेत. ही बाब दक्षिण भारतात शहामृगचे अस्तित्व असल्याचे पहिले पुरावे आहेत. इतकेच नव्हे तर ४१ हजार वर्ष जुने शहामृगांचे घर सापडणे हा देखील पहिलाच पुरातत्वीय पुरावा आहे.

मेगाफॉना म्हणजे काय?

४० किलोपेक्षा जास्त वजनाच्या प्राण्यांना मेगाफॉना असे म्हणतात. यात घोडे, हत्ती, गाय, नदी घोडे इत्यादींचा समावेश होतो. जगातील वेगवेगळ्या भागात सुमारे ४० हजार वर्षांपूर्वी यापैकी काही मेगाफॉना नष्ट झाले. आता संशोधकांचे प्रयत्न याच गोष्टीचा शोध लावण्यात आहेत की, बहुतेक मेगाफॉना पृथ्वीवरुन नष्ट का झाली? या प्रश्नांची उत्तरे मिळाली तर पृथ्वीवर मानवाच्या आगमनाचा आणि येथील वास्तव्याचा इतिहासही अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT