Ranveer-Deepika Baby eSakal
विज्ञान-तंत्र

Ranveer-Deepika Baby : कसं दिसेल दीपिका-रणवीरचं बाळ? पाहा 'एआय'ने तयार केलेला क्यूट फोटो...

AI Baby Image Generator : दीपिका आणि रणवीर हे दोघेही दिसायला अगदी आकर्षक आहेत. त्यामुळे या दोघांचंही बाळ कसं दिसेल याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

Sudesh

AI Predicts Ranveer-Deepika's Baby Face : बॉलिवूड स्टार्स दीपिका आणि रणवीर यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. दीपिका प्रेग्नंट असल्याच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून पहायला मिळत होत्या. अखेर दीपिकाने इन्स्टाग्राम पोस्ट करत आपल्या प्रेग्नंसीची बातमी कन्फर्म केली आहे. सप्टेंबर महिन्यात या दोघांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

दीपिका आणि रणवीर हे दोघेही दिसायला अगदी आकर्षक आहेत. त्यामुळे या दोघांचंही बाळ कसं दिसेल याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. मात्र, या बाळाचा चेहरा पाहण्यासाठी आपल्याला वर्षाच्या शेवटपर्यंत वाट पहावी लागणार. एवढा धीर नसेल, तर तुम्ही आत्ताच या दोघांचं बाळ कसं दिसेल हे पाहू शकता.

सध्या असे भरपूर अ‍ॅप्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये एआयच्या मदतीने होणाऱ्या बाळाचा फोटो जनरेट करता येतो. यासाठी या अ‍ॅपमध्ये केवळ दोन्ही पालकांचा फोटो अपलोड करावा लागतो. या फोटोंच्या, त्यामधील लुक्सच्या मदतीने एआय बाळाचा फोटो जनरेट करते. या अ‍ॅप्सपैकी Baby AC या अ‍ॅपने दोघांच्या बाळाचा फोटो प्रेडिक्ट केलाय.

Ranveer Deepika Baby Face Prediction AI

या अ‍ॅपच्या व्यतिरिक्त Baby Generator, Guess Baby Face, Baby Predictor असे अ‍ॅप्सदेखील गुगलच्या प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. या दोन्ही अ‍ॅप्सना 4 पेक्षा अधिक रेटिंग मिळाली आहे. अर्थात, हे अ‍ॅप्स वापरण्यापूर्वी त्यांच्या यूजर पॉलिसी तपासून घेणं गरजेचं आहे. तुम्ही अपलोड करणारे फोटो हे अ‍ॅप्स आपल्याकडे सेव्ह ठेवतात का, किंवा थर्ड पार्टीसोबत हे फोटो शेअर होतात का हे पाहूनच अ‍ॅप्स वापरण्याचा निर्णय घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT