G20 Summit Ask GITA eSakal
विज्ञान-तंत्र

G20 Summit : परदेशी पाहुण्यांसाठी उभारला 'Ask GITA' एआय चॅटबॉट! भगवद्गगीतेच्या आधारे देणार प्रश्नांची उत्तरं; पाहा व्हिडिओ

AI Chatbot : भारत मंडपम मधील 4 आणि 14 नंबरच्या हॉलमध्ये हा चॅटबॉट असणार आहे.

Sudesh

सध्या राजधानीमध्ये जी-20 परिषदेच्या बैठकीची जोरात तयारी सुरू आहे. यासाठी दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सोबतच या बैठकीसाठी येणाऱ्या विदेशी पाहुण्यांसाठी कित्येक खास गोष्टीही तयार करण्यात आल्या आहेत.

9 आणि 10 सप्टेंबर रोजी ही बैठक पार पडणार आहे. यासाठी कित्येक देशांचे अध्यक्ष, राष्ट्रपती आणि पंतप्रधान दिल्लीमध्ये येतील. त्यांच्यासोबतच त्यांचे शिष्टमंडळही असणार आहे. या पाहुण्यांसाठी 'भारत मंडपम' मध्ये एक एआय चॅटबॉट देखील उभारण्यात आला आहे.

काय आहे Ask GITA?

ASK G.I.T.A. हा एक हायटेक एआय चॅटबॉट आहे. या चॅटबॉटला एखाद्या व्यक्तीने काही प्रश्न विचारल्यास, त्यांची भगवद्गीतेच्या आधारे उत्तरं देण्यात येतील. "यश कसं मिळवावं?", "आयुष्यात आनंदी कसं रहावं?" अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही या चॅटबॉटला विचारू शकता. भगवद्गीतेमध्ये दिलेल्या उपदेशांनुसार यांची उत्तरं हा चॅटबॉट देईल. ही उत्तरं हिंदी आणि इंग्रजीमध्ये असणार आहेत.

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने एक व्हिडिओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. भारत मंडपम मधील 4 आणि 14 नंबरच्या हॉलमध्ये हा चॅटबॉट असणार आहे.

डिजिटल इंडिया एक्सपिरियन्स झोन

प्रगती मैदानावर असणाऱ्या भारत मंडपम मध्ये विशेष 'डिजिटल इंडिया एक्सपिरियन्स झोन' तयार करण्यात आला आहे. यामध्ये 2014 नंतर भारताने डिजिटल क्षेत्रात केलेल्या प्रगतीची माहिती देण्यात येईल. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाची ही संकल्पना आहे. परदेशी पाहुण्यांसमोर भारतात असणाऱ्या तंत्रज्ञानाची झलक दाखवणं हा यामागचा उद्देश्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT