Auto Expo 2023: उद्यापासून (११ जानेवारी) Auto Expo 2023 ला सुरुवात होणार आहे. या इव्हेंटमध्ये अनेक नवीन स्कूटर्स, बाइक्स आणि कार्स पाहायला मिळतील. अनेक भारतीय कंपन्या देखील या इव्हेंटमध्ये सहभागी होणार आहे. Auto Expo 2023 मध्ये जगातील पहिली सेल्फ बॅलेन्सिंग स्कूटर देखील लाँच होणार आहे.
मुंबई येथील इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनी लिगर मोबिलिटी (Liger Mobility) Auto Expo 2023 मध्ये पहिली सेल्फ बॅलेन्सिंग स्कूटर लाँच करणार आहे. ही एक इलेक्ट्रिक स्कूटर असेल.
Auto Expo 2023 मध्ये सादर होणारी ही सेल्फी बॅलेन्सिंग स्कूटर कंपनीसाठी खास ठरू शकते. Liger Mobility च्या या स्कूटरविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Liger Mobility ची स्थापना IIT आणि इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यांच्या टीम अनेक चांगल्या इंजिनिअर्सचा समावेश आहे.
स्कूटरचे डिझाइन
Liger Mobility च्या या सेल्फ बॅलेन्सिंग स्कूटरला मॉर्डन-रेट्रो थीमसह पाहण्यात आले आहे. या स्कूटरच्या फ्रंट आणि बॅकमध्ये एलईडी लाइटनिंग पाहायला मिळेल. तर फ्रंटला व्हील्ससोबत टेलिस्कोपिक सस्पेंशन दिले जाईल.
रिपोर्टनुसार, या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये डिजिटल क्लस्टर देण्यात आले आहे. स्कूटरमध्ये सेल्फ पार्किंग, लर्नर मोड, आधुनिक राइडर सेफ्टी असिस्ट आणि रिव्हर्स फंक्शन सारखे फीचर्स पाहायला मिळतील.
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये सेल्फ बॅलेन्सिंग टेक्नोलॉजीसह वॉइस कमांडचा देखील सपोर्ट मिळेल. कंपनी या स्कूटरला आधुनिक वॉइस कमांड फीचरसह सादर करेल. दरम्यान, कंपनीने अद्याप या स्कूटरच्या किंमत व फीचर्सबाबत अधिक माहिती दिलेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.