MG 5 EV Sakal
विज्ञान-तंत्र

Auto Expo 2023: MG ची शानदार इलेक्ट्रिक कार भारतात करणार एंट्री, सिंगल चार्जमध्ये पूर्ण शहर फिरता येईल

Auto Expo 2023 चे १३ ते १८ जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या इव्हेंटमध्ये एमजी मोटर आपल्या दोन शानदार इलेक्ट्रिक वाहनांना सादर करेल.

सकाळ डिजिटल टीम

Auto Expo 2023 MG 5 EV To Showcase: ऑटोमोबोइल क्षेत्रातील सर्वात मोठा इव्हेंट Auto Expo 2023 चे १३ ते १८ जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या इव्हेंटमध्ये एमजी मोटर आपल्या दोन शानदार इलेक्ट्रिक वाहनांना सादर करेल. कंपनीने एमजी४ इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर आणि एमजी५ इलेक्ट्रिक एसयूव्हीला टीझ करणे सुरू केले आहे.

MG5 EV पाच दरवाजांसह येणारी इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. या कारला २०१७ मध्ये पहिल्यांदा चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. कारची यूरोपियन बाजारात आधीपासूनच विक्री सुरू आहे. कारच्या डायमेंशनबद्दल सांगायचे तर MG5 ४६०० एमएम लांब, १८११८ एमएम रुंद आहे. तर व्हीलबेस २६५९ एमएमचे आहे. सोबतच, जास्त बूट स्पेस मिळेल.

जागतिक बाजारात MG Motor MG5 ला दोन बॅटरी पॅकसह सादर केले जाते. यात ५०.३ kWh लिथियम-आयन यूनिटचा लहान बॅटरी बॅक मिळेल. सिंगल चार्जमध्ये याची रेंज ३२० किमी आहे. याशिवाय, ६१.१ kWh बॅटरी पॅक देखील यात देण्यात आला आहे. सिंगल चार्जमध्ये याची रेंज ४०० किमीपर्यंत आहे.

MG Motor EV सोबत ११ kW AC चार्जर मिळतो. फास्ट चार्जरचा उपयोग केल्यास कार अवघ्या ४० मिनिटात ५ टक्क्यांवरून ८० टक्के चार्ज होते. एसयूव्हीमधील लहान बॅटरी पॅक १७७ पीएस पॉवर आणि २८० एनएम पीक टॉर्क जनरेट करतो. तर मोठा बॅटरी पॅक १५६ पीएस पॉवर आणि २८० एनएम पीक टॉर्क जनरेट करतो.

हेही वाचा: Amazon Sale: महागडे स्मार्टफोन्स स्वस्तात! Amazon वर चक्क निम्म्या किंमतीत मिळतायत बेस्टसेलर डिव्हाइस

कंपनीचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक एसयूव्ही अवघ्या ८.३ सेकंदात ताशी १०० किमीचा वेग पकडू शकते. तर याचा टॉप स्पीड ताशी १८५ किमी आहे. दरम्यान, एमजी मोटर या कारला १३ ते १८ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये सादर करणार आहे. कंपनी तीन डोरसह येणाऱ्या एअर ईव्हीला देखील सादर करू शकते.

हेही वाचा: द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT