MG Euniq 7 Sakal
विज्ञान-तंत्र

Auto Expo 2023: जबरदस्त! MG ने सादर केली हाइड्रोजन फ्यूल-सेल MPV, फुल टँकमध्ये 600KM धावणार

ब्रिटिश कार निर्माता कंपनी MG Motor ने Auto Expo 2023 मध्ये आपली नवीन हायड्रोजन फ्यूल सेल कार Euniq 7 ला सादर केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

MG Euniq 7 Unveiled: ब्रिटिश कार निर्माता कंपनी MG Motor ने Auto Expo 2023 मध्ये आपली नवीन हायड्रोजन फ्यूल सेल कार Euniq 7 ला सादर केले आहे. या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये याची रेंज आहे. कंपनीचा दावा आहे की, एकदा फुल टँक केल्यास कार सहज ६०५ किमी अंतर पार करू शकते.

Euniq 7 चे पॉवरट्रेन एक इलेक्ट्रोकेमिकल पॉवर जनरेशन डिव्हाइस, एक हाइड्रोजन स्टोरेज डिव्हाइस आणि एक इलेक्ट्रिक ड्राइव्ह सिस्टमचा वापर करते. हे जवळपास १५०kW पॉवर जनरेट करते. याच्या हायड्रोजन सिलेंडरची क्षमता ६.४ किलो असून, पूर्ण भरण्यासाठी केवळ ३ ते ५ मिनिटं लागतात.

MG Euniq 7 एमव्हीपीमध्ये एलईडी हेडलॅम्प्स, मोठे आणि आकर्षक ग्रिल देण्यात आले आहे. तसेच, स्लाइडिंग रियर दरवाजे व रियरला दिलेले टेल लॅम्प कारला आकर्षक बनवतात.

एमजीच्या या एमपीव्हीमध्ये ७ जण सहज प्रवास करू शकतात. कार २+२+३ कॉन्फिगरेशनसह येते. यामध्ये आधुनिक डॅशबोर्डसह पॅनोरमिक सनरुफ, ऑल डिजिटल ड्राइव्हर डिस्प्ले, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक देण्यात आला आहे.

हेही वाचा: Apple: iPhone 15 ला विसरा! iPhone 16 मध्ये मिळणार हे अफलातून फीचर; पाहा डिटेल्स

MG Motor ५ ते ७ सीटर्स कारला पसंती देणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. या एमपीव्हीला एकदा रिफिलिंग केल्यास सहज ६०० किमी अंतर पार करेल. हायड्रोजन फ्यूल सेलसह येणारी कार इतर गाड्यांच्या तुलनेत कमी प्रदूषण करते.

दरम्यान, MG Motor ने Auto Expo 2023 या ७ सीटर कारला केवळ सादर केले आहे. या एमपीव्हीची विक्री कधी सुरू होईल याबाबत कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही.

हेही वाचा: गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT