Auto Tips  esakal
विज्ञान-तंत्र

Auto Tips : महिंद्राने बनवल्या 1 लाख थार, आता येणार नवं मॉडेल

स्टर्डी लूक आणि डिझाइनमुळे महींद्राची थार ही तरुणांच्या गळ्यातलं ताईत

सकाळ डिजिटल टीम

Auto Tips : स्टर्डी लूक आणि डिझाइनमुळे महींद्राची थार ही तरुणांच्या गळ्यातलं ताईत बनली आहे. अशातच थारने नवा विक्रम प्रस्थापित केलाय. महिंद्रा थार सध्या दोन ब्रॉड ट्रिम लाइन-अपमध्ये उपलब्ध आहे - एक आहे AX(O) आणि दुसरी LX. हे दोन्ही ऑप्शन पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये मिळतात. पण आता महिंद्रा नवीन एंट्री-लेव्हल 4×4 वेरिएंट सादर करण्याच्या तयारीत आहे.

AX(O) ट्रिमच्या खालच्या मॉडेलमध्ये 2.2-लीटर डिझेल आणि 2.0-लीटर पेट्रोल इंजिन असे दोन ऑप्शन असतील. महिंद्रा अँड महिंद्राने दीड वर्षात नवीन जनरेशनच्या थारमध्ये 1 लाखांहून अधिक युनिट्स बनवले आहेत. ही SUV 2020 मध्ये लाँच करण्यात आली होती.

जानेवारी 2023 मध्ये जेव्हा महिंद्रा थार RWD वेरिएंट लाँच केला होता तेव्हा या वेरिएंटची किंमत कमी केली होती. आगामी एंट्री-लेव्हल 4WD व्हेरियंटला AX AC असं नाव दिलं जाण्याची शक्यता आहे. यात काही फीचर्स कमी केले जातील. सध्या AX(O) ट्रिमवर ऑफर सुरू आहेत. महिंद्राने AX ट्रिम बंद केली कारण या गाडीच्या साइड-फेसिंग बेंच सीटची क्रॅश टेस्ट चांगली झाली नव्हती.

महिंद्रा थार इंजिन ऑप्शन

थारमध्ये सध्या तीन इंजिन ऑप्शन उपलब्ध आहे. बेस-स्पेसिफिकेशन म्हणजे 118hp, 300Nm, 1.5-लिटर डिझेल इंजिन, ज्यात 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे आणि रीअर-व्हील-ड्राइव्ह देण्यात आलाय. त्यानंतर 152hp, 300Nm, 2.0-लिटर पेट्रोल इंजिन आणि 130hp, 300Nm, 2.2-लिटर डिझेल इंजिन आहे.

या दोन्ही इंजिनांना 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा ऑप्शन मिळतो. आणि डिझेल इंजिन फक्त 4WD मध्ये उपलब्ध आहे. पेट्रोलला 4WD आणि RWD दोन्ही कॉन्फिगरेशन मिळतात. अपकामिंग AX AC ट्रिम मध्ये दोन इंजिन आणि MT 4×4 ऑप्शन मिळण्याची शक्यता आहे.

सध्या, थारचा बाजारातील एकमेव प्रतिस्पर्धी म्हणजे फोर्स गुरखा. पण आता Maruti Jimny बाजारात येत आहे. त्यामुळे ही रायवलरी आणखीनच वाढणार असल्याचं दिसतंय. सध्या थार डिझेल मॉडेलची एक्स-शोरूम प्राईस 9.99 लाख ते 16.49 लाख रुपये आहे तर पेट्रोल मॉडेलची किंमत 13.49 लाख-15.82 लाख रुपये (एक्स-शोरूम मुंबई) दरम्यान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT