Auto Update : ह्युंदाईने त्यांची नवी कार अलीकडे लाँच केलीय. प्रसिद्ध सेडान कारने त्यांचं नेक्स्ट जनरेशन मॉडेल भारतीय बाजारपेठेत लाँच केलंय. या कारची सुरुवातीची किंमत 10.90 लाख रुपये आहे. तर टॉप व्हेरिएंटसाठीची किंमत 17.38 लाख रुपये असणार आहे.
या कारला दोन पेट्रोल इंजिन ऑप्शनमधे लाँच करण्यात आलंय. ज्यात 1.5 लीटर नॅचरल एस्पायर्ड आणि 1.5 लीटर टर्बो GDi पेट्रोल इंजिनचे ऑप्शन्स मिळतात.
कंपनीने दावा केलाय की, या कारचे नॅचरल एस्पीरेटेड इंजिन 18 ते 19 किलोमीटर प्रतिलीटर मायलेज देते. तर याचे टर्बो इंजिन जास्त पावरफुल असूनही 20.6 kmpl चा मायलेज देण्यास सक्षम आहे.
नव्या Hyundai Verna मध्ये कंपनीने बरेच बदल केले आहेत जे मागल्या मॉडेलच्या तुलनेत जास्त चांगले आहेत.
कंपनीने या कारला नवं फ्यूचरिस्टिक लुक आणि डिझाइन देण्याचा प्रयत्न केलाय. फ्लॅट बोनेट आणि उत्कृष्ट क्रीज लाइनने सजवलेल्या सेडानला फ्लेयर्ड व्हील आर्क देण्यात आले आहे, जे कारच्या साइड प्रोफाइलला मसक्यूलर लुक देतात. (Hyundai)
ह्युंदाई वर्नामध्ये फ्री स्टँडिंग ड्युअल स्क्रीन सेटअप देण्यात आलाय. ज्यात 10.25 इंचाचा फुल्ली डिजिटल इंस्ट्रुमेंटल क्लस्टर मिळतो, सोबतच समान आकाराची टचस्क्रिन इंफोटेनमेंट सिस्टिमही देण्यात आलीय.
या कारच्या इंटिरियरला ड्युएल टोन प्रीमियम थीमने सजवण्यात आलंय. कंपनीचा असा दावा आहे की यात ड्रायव्हर सेंट्रिक केबिन देण्यात आलंय.
या कारमध्ये तुम्हाला 528 लीटरची बूट स्पेस मिळते जी सेग्मेंटमध्ये सगळ्यात बेस्ट आहे. कारमध्ये देण्यात आलेले 64 कलर एम्बिएंट लायटिंग सिस्टिम याच्या इंटेरियरला आणखी मजबूत बनवते.
नव्या ह्युंदाईत कंपनीने डायमंड कट अलॉय व्हील आणि शार्क फिन एंटिना दिलाय. या एक्सपिरीयंस देतो.
या सेडान कारमध्ये फ्री स्टँडिंग ड्युअल स्क्रीन सेटअप देण्यात आलाय. ज्यात 10.25 इंचाचा फुल्ली डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर मिळतो. नव्या ह्युंदाई वर्नामध्ये कंपनीने 30 स्टँडर्ड फिचर आणि ओव्हरऑल 65 सेफ्टी फिचर्सचा समावेश करून घेतलाय. (Automobile)
या सेडान कारमध्ये कंपनीने इलेक्ट्रॉनिक सनरूफसह स्विचेबल टाइम क्लायमेट कंट्रोल सिस्टिम आणि वायरलेस फोन चार्जर दिले आहे. ह्युंदाई वर्नाने फ्रंटला एलईडी लायटिंग दिलीय, जी कॉर्नरहून पूर्ण कारला कव्हर करते. ही लायटिंग कारला उत्कृष्ट फ्रंट लुक प्रदान करते.
ही कार एकूण चार ट्रिम आणि सात कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. या सेडान कारसोबत कंपनी 3 वर्षांच्या अनलिमिटेड किलोमीटर्सची वॉरंटीही देते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.