टु व्हिलर सेक्टरमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) आणि बाईकच्या रेंजही पेट्रोल बाईक आणि स्कूटरप्रमाणे वाढत चालली आहे. त्यात मोठ्या कंपन्यांसह नवीन स्टार्टअपचे स्कूटरचाही समावेश आहे. जर तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल, तर जाणून घ्या खूपच कमी किंमतीत येणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरचे तपशील...
आम्ही सांगणार आहोत Avam Motors ची इलेक्ट्रिक स्कूटर Xero Plus विषयी. कंपनीचा ही सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जे अवजड वस्तू वाहून नेऊ शकते. या स्कूटरच्या बॅटरी आणि पाॅवरविषयी बोलाल तर कंपनीने त्यात 48V 24 Ah चे लिथियम आयन बॅटरी पॅक दिले आहे. त्याबरोबर ८०० व्हॅट मोटार दिली गेली आहे, जे एक बीएलडीसी मोटार आहे. स्कूटरच्या बॅटरबाबत कंपनी म्हणते, ती नाॅर्मल चार्जरने चार्ज केल्यास तिची बॅटरी ४ ते ५ तासात पूर्ण चार्ज होते.(Avan Motors Xero Plus Electric Scooter Gives 100 Km Range In Single charge)
स्कूटरची रेंज आणि स्पीड म्हणाल तर ही स्कूटर एकदा फुल चार्ज केल्यानंतर १०० ते ११० किलोमीटरपर्यंत धावू शकते. ४५ किलोमीटर प्रतितास इतके टाॅप स्पीड मिळते. स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टिम म्हणाल तर कंपनीने तिच्या फ्रंट व्हिलमध्ये डिस्क ब्रेक आणि रिअर व्हिलमध्ये ड्रम ब्रेकचे काॅम्बिनेशन दिले आहे. स्कूटरमध्ये डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल कंसोल, ईबीएस, तीन स्पीड मोट (लो,मीडियम, हाय), रिअर टेल बाॅक्स, ओपन ग्लोव बाॅक्स विथ हुक आदी फिचर्स दिले आहेत. सेफ्टीचा विचार करता कंपनीने त्यात सेफ्टी पार्किंग ब्रेक सेन्सर आणि लाॅकेबल बॅटरी कंपार्टमेंटसारखे फिचर्स देऊ केली आहेत. स्कूटरच्या फ्रंटमध्ये टेलिकाॅपिक सस्पेंशन आणि रिअरमध्ये काॅईल स्प्रिंग सस्पेन्शन दिले आहे.
कंपनीच्या दाव्यानुसार हे हलके वजनाचे स्कूटर १५० किलोग्रॅम वजन कोणत्याही अडचणीशिवाय वाहून नेऊ शकते. या इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची किंमत ५२ हजार ८०९ रुपयांपासून सुरु होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.