फास्टॅग रिचार्ज Esakal
विज्ञान-तंत्र

Fastag Recharge करताना ही चूक करू नका, नाहीतर पडेल ४ हजारांचा भुर्दंड

Fastag रिचार्ज करताना झालेल्या काही चुकांमुळे तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं

Kirti Wadkar

टोलनाक्यांवर टोल भरणं सोयीचं व्हावं यासाठी Fastag ची सुविधा शासनाने सुरु केली. तसचं टोल भरण्यासाठी फास्टॅग बंधनकारक केलं आहे. यामुळे टोल नाक्यांवरील रांगा कमी होण्यास मदत झाली आहे. मात्र जर तुम्ही फास्टॅग रिचार्ज करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. Avoid Mistakes while Recharging Fastag

रिचार्ज Recharge करताना झालेल्या काही चुकांमुळे तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं. यासाठीच आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला हे नुकसान टाळता येणं शक्य आहे. how to recharge Fastag

Fastag हे बँकेकडून जारी केलं जातं. त्यामुळे जेव्हा तुम्हाला रिचार्ज करायचं आहे तेव्हा तुम्हाला या बँकेची माहिती असणं गरजेचं आहे. या बँकेचे डिटेल्स तुम्हाला योग्य प्रकारे भरायचे आहेत. एका चुकीमुळे तुमचं नुकसान होवू शकतं. यामुळे तुमच्या बँक अकाऊंटमधून पैसे तर कट होतील मात्र रिजार्ज होणार नाही. 

बँक सिलेक्ट केल्यानंतर वाहन नंबर देखील योग्य टाकणं गरजेचं आहे. इथं वाहन नंबर म्हणजेच रजिस्टेशन नंबर भरावा लागतो. त्यामुळे जरी तुम्ही कारचा नंबर योग्य टाकला नाहीत तर बँक अकाऊंटमधून पैसे कट होतील मात्र रिचार्ज होणार नाही.

बँक डिटेल्स आणि गाडीचा रजिस्टेशन  नंबर टाकल्यानंतर कस्टमर डिटेल भरावे लागतात. सगळे डिटेल्स भरल्यानंतर डेबिट कार्ड किंवा UPI चा पर्याय येतो. यावेळी योग्य पिन टाकणं गरजेचं आहे. fastag recharge scam

फास्टॅगशी संबधीत कोणतीही समस्या असेल जसं की पैसे कट होवूनही रिचार्ज न होण किंवा रिचार्जमधील इतर अडचणींसाठी NHAI चा हेल्पलाईन नंबर १०३३ वर कॉल करून तुम्ही तुमची कंप्लेंट रिजिस्टर करू शकता. 

नियमितपणे प्रवास करणाऱ्यांनी कायम फास्टॅगचं बॅलेंस असेल याची काळजी घ्यावी. अनेकदा टोल प्लाझावर पोहचल्यावर फास्टॅग रिचार्ज संपल्याचं लक्षात येत. अशा वेळी मोठ्या गडबडीत रिचार्ज केलं जातं. याच वेळी एखादी चूक होण्याची शक्यता असते. बऱ्याचदा रिचार्ज केल्यानंतर लगेचच फास्टॅगवर बॅलेंस येत नसल्यानेही तुम्हाला अडचण निर्माण होवू शकते. त्यामुळे नियमित बॅलेंस मेंटेन करा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT