Mobile Safety Tips Esakal
विज्ञान-तंत्र

Mobile Safety Tips: मोबाईलसाठी पब्लिक चार्जर वापरताय तर सावधान, तुमचा डेटा आहे धोक्यात

Mobile Safety Tips: मोबाईल चार्ज करण्यासाठी अलिकडे मॉल्सपासून, विविध रेस्टरंट, कॅफे अशा ठिकाणी पब्लिक चार्जरची सोय करण्यात आली आहे. मात्र या फ्री चार्जिंग स्टेशन्सवर मोबाईल चार्ज करणं कदाचित तुमच्यासाठी धोक्याचं ठरू शकतं

Kirti Wadkar

Mobile Safety Tips: मोबाईल ही सध्याच्या घडीला प्रत्येकासाठीच महत्वाची गोष्ट बनली आहे. कुटुंबियांच्या सपर्काचं माध्यम ते अगदी ऑफिस किंवा नोकरीचे महत्वाचे कॉल, महत्वाचे रेकॉर्ड अगदी बँकिंगसाठी Banking देखील आपण मोबाईलचा वापर करतो.

त्यामुळेच या मोबाईलमधील डेटा Data हा अत्यंत महत्वाचा असतो. Avoid Mobile Charging at Public Charging Stations to keep safe data

संपूर्ण दिवस कामासाठी किंवा घराबाहेर इतर कारणासाठी जाताना मोबाईल चार्ज Mobile तर आहे ना हे आपण पहिले तपासून पाहतो. मात्र अनेकदा विविध कारणांनी घराबाहेर असताना मोबाईलची बॅटरी Battery कमी होते आणि बऱ्याचदा चार्जरही सोबत नसतो. अशा वेळी आपल्यापैकी अनेक जण पब्लिक चार्जरचा वापर करतात. 

मोबाईल चार्ज करण्यासाठी अलिकडे मॉल्सपासून, विविध रेस्टरंट, कॅफे अशा ठिकाणी पब्लिक चार्जरची सोय करण्यात आली आहे. मात्र या फ्री चार्जिंग स्टेशन्सवर मोबाईल चार्ज करणं कदाचित तुमच्यासाठी धोक्याचं ठरू शकतं.

अमेरिकेमध्ये FBI नुकतीच हॅकिंगच्या शक्यतांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेमध्ये मोबाईल युजर्सनी बाजार किंवा मॉलमध्ये असलेल्या पब्लिक चार्जिंग स्टेशन्सचा वापर टाळून पाॅवर बँक बाळगण्याचा सल्ला एफबीआयने दिला आहे.

FBI च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एका पोस्टच्या मदतीने नागरिकांना ही सुचना देण्यात आली आहे. नागरिकांनी एअरपोर्ट, हॉटेल किंवा शॉपिंग सेंटरमध्ये उपलब्ध असलेल्या फ्री चार्जिंग स्टेशन्सचा वापर करू नये.

यामुळे युजर्सच्या डिव्हाइसमध्ये मालवेअर किंवा स्पाइंग सॉफ्टवेअर इंस्टॉल केलं जाऊ शकतं. त्याएवजी डिव्हाइस चार्ज करण्यासाठी इलेक्ट्रीक आउटलेटचा वापर करा असं सांगण्यात आलंय. 

तुमचा खासगी डेटा धोक्यात

FCC वेबसाइटनुसार सायबर सुरक्षा तज्ञांनी एक चेतावनी जारी केली आहे. यात सायबर क्रिमिनल हे इलेक्ट्रिक डिव्हाईसमध्ये किंवा मोबाईलपर्यंत पोहचण्यासाठी पब्लिक चार्जिंग स्टेशनवर असलेल्या USBच्या मदतीने डिव्हाईसमध्ये मालवेअर इंजेक्ट करत आहेत.

जर एखादी व्यक्ती पब्लिक USB चा वापर करत असेल तर हा मालवेअर डिव्हाइसला लॉक करू शकतो किंवा खासगी डेटा आणि पासवर्ड थेट सायबर क्रिमिनलपर्यंत पोहचवू शकतो.

जूस जॅकिंगचा सापळा

 जूस जॅकिंग हे एक असं माध्यम आहे जे अनेक हॅकर्स वापरतात. २०२१ सालामध्ये अशा प्रकारच्या काही घटना उघडकीस आल्या होत्या. हे हॅकर्स एअरपोर्ट किंवा शॉपिंग सेंटरसारख्या ठिकाणी सार्वजनिक यूएसबी पोर्टला लक्ष्य करतात आणि युजरच्या फोनला हॅक करतात.

या पब्लिक स्टेशनवरील USB केवल ही केबल चार्जिंग केबल नसून ते एक डेटा ट्रांसफर चॅनल असतं. जेव्हा तुम्ही या USB च्या मदतीने फोनमध्ये मालवेअर इंस्टाल करतात. जूस जॅकिंगने तुमचा मोबाईलचं नव्हे तर टॅबलेट, लॅपटॉप किंवा इतर डिव्हाइसही हॅक केले जाऊ शकतात.

RBIने देखील अॅडव्हायजरी जारी केली

जूस जॅकिंगच्या माध्यामातून होणारं नुकसान लक्षात घेता भारतीय रिझर्व बँकने देखील एक अॅडव्हायजरी जारी केली आहे. सार्वजिन ठिकाणी उपलब्ध असलेलं चार्जिंग स्टेशनचा वापर केल्याने तुमच्या फोनमध्ये मालवेअर इंस्टॉल होण्याची शक्याता आहे असं RBI ने म्हंटलं आहे.

यामुळे सायबर गुन्हेगार तुमच्या फोनमधील पर्सनल डेटा, ईमेल, मेसेज आणि फाइल्स एक्सेस करू शकतात. यामुळे सार्वजिन स्थळांवरील चार्जिंग स्टेशनसचा वापर टाळा.

चार्जिंग कियोस्कची ठिकाणं

सायबर सेल ऑफिसच्या माहितीनुसार अशा घटना भारतात दिल्ली , बंगळूर, मुंबई, पुणे, हैदराबाग सारख्या मोठ्या शहरांमध्ये पाहायला मिळतात.

एका संशोधनात असं आढळून आलं की सार्वजनिक ठिकाणी लागलेल्या चार्जिंग स्टेशनपैकी २२ टक्के कियोस्क असे होते जे सुरक्षित नव्हते किंवा आधीपासून हॅकर्सने तिथं ताबा मिळवला होता. 

हे देखिल वाचा-

ही घ्या काळजी

जूस जॅकिंगसारख्या सापळ्यातून वाचण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं महत्वाचं आहे. यात महत्वाची गोष्ट म्हणजे सार्वजविक USB चा वापर करून मोबाईल चार्ज करताना अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे. यासाठी युजर्सनी स्वत:चा चार्जर किंना USB केबलचा वापर करावा.

जर पब्लिक USB चा वापर करत असाल तर डिव्हाइसमध्ये डेटा ब्लॉकरचा वापर करा. किंवा तुमच्या डिव्हाईसमध्ये अति महत्वाची माहिती किंवा डेटा नाही याची खबरदारी बाळगा.

तसचं तुमच्या डिव्हाइसमध्ये कायम टू फॅक्टर ऑथेंटिफिकेशनचा पर्याय सुरू ठेवा. तसंच फोनमधील सेटिंगमध्ये असलेल्या USB debugging या पर्यायातील Install over ADB हा पर्याय कायम बंद ठेवा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT