Don't do this common washing machine mistakes esakal
विज्ञान-तंत्र

Washing Machine Tips : वाॅशिंग मशीन वापरताना टाळा 'या' लहान चुका अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान

Electric Gadgets : कपडे स्वच्छ धुण्यासाठी वाॅशिंग मशीन अगदी सोयीस्कर असली तरी त्याचा योग्य वापर करणं खूप गरजेचं आहे.

Saisimran Ghashi

Tech Tips : कपडे स्वच्छ धुण्यासाठी वाॅशिंग मशीन अगदी सोयीस्कर असली तरी त्याचा योग्य वापर करणं खूप गरजेचं आहे. मशीन नुकतीच घेतली असो वा जुनी असो, कपडे स्वच्छ आणि व्यवस्थित धुवून निघण्यासाठी काय करू नये ते जाणून घेणे महत्त्वाचं आहे. चला तर वाॅशिंग मशीन वापरताना टाळायच्या चुका पाहूया...

१. कपड्यांचा खच नको : वाॅशिंग मशीनमध्ये कपडे खचाखच भरू नका. असे केल्याने कपड्यांना पुरे पाणी मिळणार नाही आणि स्वच्छता राहील नाही. अगदी कमी कपडे धुवायचे असतील तरही मोठा सायकल वापरू नका. यामुळे पाणी आणि वीज वाया जाईल.

२. खिशात काहीही विसरू नका : कपडे मशीनमध्ये टाकण्यापूर्वी खिसे तपासा. रुमाल, प्लास्टिकच्या खेळण्यांसारख्या वस्तू,चाव्या किंवा अन्य काही लहानग्या वस्तु राहिल्या तर ते वॉशिंग मशीनसाठी त्रासदायक ठरेल. या वस्तु वॉशिंग मशीनमध्ये अडकल्यास ते काढणे अवघड होऊन बसते. अश्या वेळी वॉशिंग मशीन बंद देखील पडू शकते.

३. कंडिशनर थेट कपड्यावर टाकू नका : फॅब्रिक कंडिशनर कधीही थेट कपड्यावर टाकू नये. त्यामुळे कपड्यांवर डाग पडू शकतात. वॉशिंग मशीनच्या मॅन्युअलमध्ये योग्य माहिती पाहा. कंडिशनर टाकण्यासाठी वेगळा कप्पा असतो.त्यामध्येच फॅब्रिक कंडिशन टाका किंवा मग अगोदर थोडी पाणी घेऊन त्यामध्ये कंडिशनर मिक्स करून घ्या.

४. साबण जास्त वापरणे टाळा : वॉशिंग पावडर जास्त वापरण्याने कपड्यांवर थर राहतो आणि कपडे स्वच्छ होत नाहीत. लिक्विड, पावडर आणि कॅप्सूल यांचे प्रमाण जाणून घेण्यासाठी गाईड (guide) वाचा आणि नेहमी उत्पादनाच्या लेबलवरील सूचनांचे पालन करा.

५. ओले कपडे राहू देऊ नका : ओल्या कपड्यांमुळे मशीनच्या ड्रममध्ये किंवा अगदी कपड्यांवरही बुरशी येऊ शकते. रिन्सचा चक्र संपल्यानंतर शक्य तितक्या लवकर कपडे बाहेर काढा आणि बाहेर, हवेमध्ये सुकवा.

६. मोठ्या दुरुस्ती स्वतः करू नका : काही साध्या समस्या जसे की अडकलेली पाण्याची पाईप थोडासा प्रयत्न करून मशीनच्या मॅन्युअलच्या मदतीने सोडवता येऊ शकतात. परंतु, जास्त मोठ्या दुरुस्ती, विशेषत: वीज किंवा प्लंबिंगशी संबंधित असलेल्या दुरुस्तीसाठी नेहमी तज्ञ बोलवा.

वॉशिंग मशीन वापरण्याच्या या सोप्या टिप्समुळे तुमच्या कपड्यांची धुलाई आता आणखी सोपी होईल. कपडे धुण्यासाठी अगदी सोप्या पद्धती आपण सगळेच फॉलो करतो. पण त्याच बरोबर कपडे धुताना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊन तशी काळजी घेतल्यास तुम्ही तुमची वॉशिंग मशीन आणि कपडे दोन्ही चांगल्याप्रकारे वापरू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “आजही तो कुटुंबासाठी काही बोलत नाही….”; सांगता सभेत अजित पवारांच्या आईचं पत्र दाखवलं वाचून

Sports Bulletin 18th November: गौतम गंभीरला हाय कोर्टाकडून दिलासा ते चेतेश्वर पुजारावर बॉर्डर-गावस्कर मालिकेत नवी जबाबदारी

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Latest Maharashtra News Updates : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

SCROLL FOR NEXT