Protect Your UPI Payments 5 Safety Tips to Avoid Scams esakal
विज्ञान-तंत्र

UPI Scams: UPI पेमेंट्स करताना टाळा 'या' चुका; अन्यथा होऊ शकतं इतकं मोठं नुकसान

Saisimran Ghashi

Tech Tips : आजकाल ऑनलाईन पेमेंटसाठी यूपीआय सर्वात लोकप्रिय आहे. पण गेल्या काही वर्षात फसवणूक करणाऱ्या फ्रॉड लोकांनी चांगल्या सुज्ञ आणि त्याचबरोबर अशिक्षित लोकांचे पैसे चोरण्याचे मार्ग शोधून काढले आहेत. म्हणूनच सरकार 2,000 रुपयांहून अधिक रकमेच्या पहिल्या यूपीआय हस्तांतरणावर 4 तासांची मर्यादा आणण्याचा विचार करत आहे.

परंतु तुम्ही काळजी करू नका. तुमच्या यूपीआय पेमेंट्स सुरक्षित करण्यासाठी NPCI च्या या 5 सोप्या टिप्स आहेत.

पैसे जमा करण्यासाठी यूपीआय पिनची गरज नाही

फसवणूक करणारे लोक तुम्हाला पैसे मिळविण्यासाठी यूपीआय कोड स्कॅन करायला सांगून तुमची फसवणूक करतात. पण हे फ्रॉड आहे. NPCI च्या म्हणण्यानुसार, यूपीआय कोड स्कॅन केल्याने फक्त पेमेंट केली जाते, पैसे जमा होत नाहीत. म्हणून पुढच्या वेळी कोणी तुम्हाला पैसे पाठवण्यासाठी यूपीआय स्कॅन करायला सांगतो तेव्हा सावध रहा.

यूपीआय पिन फक्त पैसे देण्यासाठी टाका

फसवणूक करणारे लोक तुम्हाला पैसे मिळविण्यासाठी यूपीआय पिन टाकण्यास सांगू शकतात. पण NPCI स्पष्ट करते की, यूपीआय पिन फक्त पैसे कपाण्यासाठी वापरला जातो, जमा करण्यासाठी नाही.

पैसे पाठवण्यापूर्वी नाव तपासा

बहुतेक लोक पैसे पाठवण्यापूर्वी प्राप्तकर्त्याचे नाव तपासायला विसरतात. एखाद्या दुकानात विविध QR कोड असतील तर हे अगदी सामान्य आहे. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीला यूपीआय पेमेंट करत असाल तर, तुम्ही जे QR कोड स्कॅन केले आहे ते त्यांचेच आहे ना याची नक्की पुष्टी करा.

यूपीआय पिन शेअर करू नका

हे फारसे वापरले जाणारे फसवे नसले तरी, कधीकधी फसवणूक करणारे लोक तुम्हाला अॅप डाउनलोड करायला सांगू शकतात, जिथे तुम्हाला व्यवहार पूर्ण करण्यासाठी तुमचा यूपीआय पिन टाकावा लागतो. असे झाल्यास, पेमेंट अॅपची प्रामाणिकता तपासा आणि तुमची पेमेंटची माहिती घालण्यापूर्वी अॅपची ओळख पटवा. तुमचा यूपीआय पिन फक्त अॅपच्या पिन पेजवरच टाका आणि तो इतर कुठेही लिहून ठेवू नका.

स्क्रीन-शेअरिंग अॅप्स डाउनलोड करू नका.

आपल्याला न ओळखणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडून स्क्रीन-शेअरिंग आणि मेसेज फॉरवर्डिंग अॅप्सच्या लिंक्ससह संदेश आला तर, प्रथम त्यांना ते काय करते आणि त्यांना तुमच्या डिव्हाइसवर प्रवेश का आवश्यक आहे ते विचारून बघा. नेहमी लक्षात ठेवा, कोणतीही वैध संस्था वापरकर्त्यांना फोनवर OTP किंवा कोणतीही गोपनीय माहिती किंवा अॅप शेअर करण्याची विनंती करणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT