Ayodhya Ram Mandir Cyber Scam eSakal
विज्ञान-तंत्र

Ayodhya Ram Mandir : राम मंदिराच्या नावाने होतायत सायबर क्राईम! तुम्हालाही आला का 'Free VIP Pass' मिळवून देणारा मेसेज?

Ram Mandir VIP Pass Scam : पंतप्रधान मोदींनी जनतेला 22 तारखेला अयोध्येत न येण्याचं आवाहन केलं आहे. मात्र तरीही कित्येक जण हा सोहळा 'याचि देही याचि डोळा' पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Sudesh

Ayodhya Ram Mandir VIP Pass : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची प्रतिक्षा संपूर्ण देश करत आहे. 22 जानेवारीच्या शुभ मुहूर्तावर हा सोहळा पार पडणार आहे. या साठी अयोध्येत मोठ्या प्रमाणात कार्यक्रम सुरू झाले आहेत. पंतप्रधान मोदींनी जनतेला 22 तारखेला अयोध्येत न येण्याचं आवाहन केलं आहे. मात्र तरीही कित्येक जण हा सोहळा 'याचि देही याचि डोळा' पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

याचाच फायदा सध्या कित्येक सायबर गुन्हेगार घेत आहेत. सध्या व्हॉट्सअ‍ॅप आणि सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. यामध्ये राम मंदिराचा फ्री व्हीआयपी एन्ट्री पास मिळवून देण्याचं आमिष दिलं आहे. यासोबत एक लिंकही देण्यात आली आहे. मात्र ही लिंक खोटी असून, या माध्यमातून सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करत आहेत. (Cyber Crime)

काय लिहिलंय मेसेजमध्ये?

फॉरवर्ड होत असणाऱ्या या मेसेजमध्ये एका अ‍ॅपची लिंक देण्यात आली आहे. हे अ‍ॅप इन्स्टॉल केल्यास अयोध्येतील श्रीराम मंदिराचा व्हीआयपी पास मिळत असल्याचं या मेसेजमध्ये लिहिलं आहे. मात्र, केंद्र सरकार किंवा राम मंदिर ट्रस्ट यांपैकी कोणीही अशी ऑफर दिलेली नाही. त्यामुळे अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करु नये असं आवाहन केलं जात आहे. (Ram Mandir VIP Entry Pass Scam)

मालवेअरचा धोका

अशा प्रकारचे कोणतेही अनोळखी अ‍ॅप इन्स्टॉल करणं धोक्याचं आहे. या माध्यमातून फोनमध्ये मालवेअर पाठवले जाऊ शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून धोकादायक व्हायरस देखील फोनमध्ये इन्स्टॉल केले जाऊ शकतात. यामुळे मोबाईलचा रिमोट अ‍ॅक्सेस देखील स्कॅमर्सना मिळू शकतो. (Malware threat)

काय काय होऊ शकतं चोरी?

अशा प्रकारचे मालवेअर फोनमध्ये आल्यास आपले मेसेज, कॉल्स, फाईल्स, फोटो, कॉन्टॅक्ट आणि यूपीआय अ‍ॅप्समधील पासवर्ड अशा कित्येक गोष्टी सायबर गुन्हेगारांच्या हाती लागू शकतात. त्यामुळेच अशा प्रकारच्या धोकादायक लिंक्सवर क्लिक करणं टाळावं, तसंच असे मेसेजही पुढे फॉरवर्ड करू नये असं आवाहन तज्ज्ञांनी केलं आहे. (What can be stolen?)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Electronic Voting Machine : EVM मशीनवर कशी मोजली जातात मते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra next CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 'निकाला'नंतर तावडेंची बदलली भाषा, कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

Kagal Assembly Election Results 2024 : मुश्रीफांनी समरजित घाटगेंचा केला टप्प्यात कार्यक्रम; कागलमध्ये लगावला 'विजयी षटकार'

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

SCROLL FOR NEXT