Ayodhya Security eSakal
विज्ञान-तंत्र

Ayodhya Security : अयोध्येच्या सुरक्षेसाठी वापरलं जाणार एआय तंत्रज्ञान, अँटी-ड्रोन टेक्नॉलॉजी; कसं करणार काम?

२२ जानेवारीला जगभरातील व्हीआयपी लोक आणि श्रीरामभक्त अयोध्येत उपस्थित असणार आहेत. यामुळेच या पवित्र दिवशी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अयोध्येचं रुपांतर एका अभेद्य किल्ल्यात करण्यात आलं आहे.

Sudesh

Ayodhya Security Update : अयोध्येतील राम मंदिरातील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आजपासून पूजा सुरू करण्यात आली आहे. एकीकडे प्रायश्चित पूजा सुरू झालेली असताना, दुसरीकडे अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था देखील वाढवण्यात आली आहे.

२२ जानेवारीला जगभरातील व्हीआयपी लोक आणि श्रीरामभक्त अयोध्येत उपस्थित असणार आहेत. यामुळेच या पवित्र दिवशी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अयोध्येचं रुपांतर एका अभेद्य किल्ल्यात करण्यात आलं आहे. सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात एआयचा वापर करण्यात येतो आहे. (Ram Mandir 22nd January)

अयोध्येमध्ये लोकांच्या सुरक्षेसाठी तब्बल 10 हजार सीसीटीव्ही कॅमेरे (Ayodhya Security Update) बसवण्यात आले आहेत. तसंच एक अँटी-ड्रोन प्रणाली याठिकाणी तैनात केली आहे, हे तंत्रज्ञान आजूबाजूला उडणारी कोणतीही अनधिकृत वस्तू टिपून, त्याचा टेकऑफ पॉइंट शोधून काढू शकते. एवढंच नाही, तर हवेतच कोणतंही ड्रोन आपल्या कंट्रोलमध्ये घेण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे. उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी पीटीआयला याबाबत माहिती दिली. (Ayodhya Anti-Drone System)

एआयचा प्रयोग

अयोध्येतील सुरक्षा व्यवस्थेमध्ये एआयचा वापरही केला जाणार आहे. पायलट प्रोजेक्ट म्हणून ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. हे यशस्वी झाल्यास पुढे विविध ठिकाणी सुरक्षेसाठी एआयचा वापर केला जाईल; असंही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं आहे. (Ayodhya Security Update)

राम मंदिराच्या आजूबाजूला असणारे टॅक्सीचालक, ई-रिक्षाचालक, अयोध्येतील हॉटेल कर्मचारी तसंच याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख पडताळणी करण्यात येणार आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अयोध्येमध्ये निमलष्करी दल आणि पीएसीच्या 26 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सोबतच 8,00 पोलीस मित्र, यूपी अँटी टेरर स्क्वॉड, स्पेशल टास्क फोर्स टीम्स, राष्ट्रीय सुरक्षा गार्ड याठिकाणी तैनात करण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT