Bajaj Freedom 125 vs Hero Super Splendor XTEC : भारताच्या बजाज ऑटो कंपनीने ग्राहकांसाठी पुण्यात जगातील पहिली CNG बाईक लाँच केली आहे. 125 सीसी सेगमेंटमध्ये लॉन्च केलेल्या Bajaj Freedom 125 बाईकसाठी स्पर्धा नाही कारण ही बाईक दुहेरी-इंधन पर्यायावर चालते म्हणजे ती पेट्रोल आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) या दोन पर्यायावर एका बटण स्विचसह चालते.
पण 125 CC सेगमेंटमध्ये ही CNG बाईक Hero Super Splendor XTEC शी स्पर्धा करते. चला तर जाणून घेऊया या दाेन्ही बाईकबद्द्ल किंमत, इंजिन, मायलेज, फीचर्स.
बजाज फ्रीडमबद्दल सांगायचे झाले तर या बाइकमध्ये 125cc सिंगल-सिलेंडर इंजिन आहे Freedom 125 9.5 PS पॉवर आणि 9.7 Nm टॉर्क जनरेट करू शकते. तर हिरो सुपर स्पलेंडरमध्ये XTEC 124.7 cc इंजिन आहे आणि ही बाईक 10.7bhp पॉवर आणि 10.6Nm टॉर्क जनरेट करते.
बजाजचा दावा आहे की फ्रीडम 125 बाईक 213 किलोमीटर प्रति किलोग्राम सीएनजीचे तर पेट्रोलवर 130 किमी पर्यंत चांगले मायलेज देते. ही बाईक एक किलोग्राम सीएनजीवर 101 किलोमीटर आणि एक लिटर पेट्रोलवर 65 किलोमीटरपर्यंत अंतर कापू शकते.Hero MotoCorp च्या कंपनीच्या साइटनुसार, Hero Super Splendor XTEC मॉडेल एक लिटर पेट्रोलवर 68 किलोमीटरपर्यंत मायलेज देते.
Freedom 125 बाइकमध्ये LED हेडलाइट आणि टेल लॅम्प, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह LCD डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे जो मिस्ड कॉल अलर्ट पाठवतो आणि कॉलर आयडी आणि बॅटरी स्टेटस यासारखी माहिती मिळते, चार्जिंगसाठी USB पोर्ट देण्यात आला आहे.
Hero Super Splendor XTEC मध्ये ब्लूटूथ-सक्षम डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल मिळते जे रिअल-टाइम इंधन कार्यक्षमता, संदेश-कॉल अलर्ट दर्शवते. याशिवाय या बाइकमध्ये यूएसबी चार्जिंग पोर्टही देण्यात आला आहे. ही बाईक स्टार्ट-स्टॉप तंत्रज्ञानासोबतच, सुपर स्प्लेंडरमध्ये एलईडी हेडलाइट आणि टेल लॅम्प आहेत.
Bajaj Freedom 125 CNG बाईक तीन प्रकारात मिळते, NG04 Drum व्हेरियंटची किंमत 95 हजार रुपये (एक्स-शोरूम), NG04 Drum LED व्हेरियंटची किंमत 1 लाख 5 हजार रुपये (एक्स-शोरूम) आणि NG04 Disc LED व्हेरियंटची किंमत 1 लाख रुपये आहे.
Hero Super Splendor XTEC बाईक दोन प्रकारांमध्ये मिळते. तुम्हाला या बाईकचा Super Splendor Drum व्हेरिएंट किंमत 85,178 (एक्स-शोरूम) आणि Super Splendor Disc व्हेरिएंट Rs 89,078 (एक्स-शोरूम) किंमती मध्ये मिळेल.
बजाज फ्रीडम 125 CNG ही त्याच्या प्रवासी वर्गातील पहिली मोटरसायकल आहे जी ट्रेलीस फ्रेमवर आधारित आहे. 1340 मिमीच्या व्हीलबेससह मोटारसायकल सर्वात लांब आहे आणि 785 मिमी सीटची लांबी आहे, तर 825 मिमी उंच सीटची उंची आहे. एंट्री-लेव्हलला समोर 130 मिमी Drum Brake मिळते. फ्रीडम ही १२५ सीसी सेगमेंटमधील पहिली मोटरसायकल आहे जी मागील मोनो-शॉकने सुसज्ज आहे.
सुपर स्प्लेंडर पारंपारिक ट्यूबलर डायमंड फ्रेम, 1267 मिमी व्हीलबेस आणि 793 मिमीच्या सीटची उंचीवर आधारित आहे. एंट्री-लेव्हल सुपर स्प्लेंडर समोर आणि मागील बाजूस 130 मिमी Drum Brakeसह सुसज्ज आहे तर शीर्ष मॉडेलमध्ये 240 मिमी Front Disc Brake आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.