Bajaj Platina 110 Vs TVS Radeon : आपल्यापैकी बरेच जण बाईक खरेदी करताना तिच्या किमतीसह मायलेजची चौकशी आधी करतात. जेणेकरून त्यांना बाईक चालवण्याचा खर्च खमी ठेवता येईल.
तुम्हालाही चांगले मायलेज देणारी बाईक घ्यायची असेल, पण तुम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायांमधून बाईक निवडू शकत नसाल, तर कमी बजेटमध्ये जास्त मायलेज देणार्या दोन लोकप्रिय बाइक्सचे डिटेल्स आज आपण जाणून घेणार आहोत.
आज आपण बजाज प्लॅटिना 110 Vs TVS Radeon याबद्दल जाणून घेणार आहेत. ज्यामध्ये या दोन्ही बाईकची किंमत, इंजिनची, मायलेजसह सगळे तपशील जाणून घेणार आहोतय
किमतीत किती फरक आहे?
बजाज प्लॅटिना 110 ची किंमत 68,544 रुपये ते 72,224 रुपये यादरम्यामन आहे . तर TVS Radeon ची किंमत 59,925 रुपये ते 78,414 रुपये यादरम्यामन आहे. या किंमतीनुसार, TVS Radeon त्याच्या प्रतिस्पर्धी बजाज प्लॅटिनाच्या सुरूवातीच्या किंमतीपेक्षा सुमारे 9 हजार रुपये स्वस्त आहे.
इंजिन कोणाचं चांगलं आहे..
बजाज प्लॅटिना 110 मध्ये, कंपनीने 115.45 सीसीचे सिंगल सिलिंडर इंजिन दिले आहे जे 8.60 पीएस पॉवर आणि 9.81 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 4 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
TVS Radeon मध्ये कंपनीने 109.7 cc चे सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे ज्यात 4 स्पीड गियरबॉक्स देण्यात आला आहे. हे इंजिन 8.19 पीएस पॉवर आणि 8.7 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. दोन्ही बाईकचे इंजिन पाहता, बजाज प्लॅटिना इंजिन पॉवर आणि टॉर्कच्या बाबतीत TVS Radeon पेक्षा चांगले आहे.
जास्त मायलेज कोण देतं?
बजाज प्लॅटिना 110 च्या मायलेजबद्दल, बजाज ऑटोचा दावा आहे की ही बाईक 80 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते, तर TVS Radeon च्या मायलेजबद्दल, TVS Motors दावा करते की ही बाईक एका लिटर पेट्रोलवर 73.68 किलोमीटर मायलेज देते.
TVS मोटर्स आणि बजाज ऑटोने केलेल्या मायलेजच्या दाव्यांवर विश्वास ठेवला तर बजाज प्लॅटिना 1 लिटर पेट्रोलवर TVS Radeon पेक्षा सुमारे 6.5 किमी जास्त मायलेज देते.
ब्रेकिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर, बजाज प्लॅटिना 110 मध्ये, कंपनीने फ्रंट व्हीलमध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक दिला आहे, ज्यामध्ये सिंगल चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम उपलब्ध आहे.
TVS Radeon मध्ये, कंपनीने पुढील आणि मागील दोन्ही चाकांमध्ये ड्रम ब्रेक दिले आहेत ज्यात कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम इंस्टॉल केली आहे.
ब्रेकिंग सिस्टीम पाहता, बजाज प्लॅटिनाची ब्रेकिंग सिस्टीम TVS Radeon पेक्षा खूपच चांगली आहे ज्यामध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम बसवण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.