Game of The Year : यावर्षीच्या गेम अवॉर्ड्सची घोषणा करण्यात आली आहे. लॉस एंजेलिसमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला. यामध्ये Game of The Year हा सर्वोत्कृष्ट गेमचा पुरस्कार 'बाल्डर्स गेट 3' या गेमला मिळाला. यासोबतच Baldur's Gate 3 गेमला आणखी पाच पुरस्कार मिळाले.
गेम ऑफ दि इयर या कॅटेगरीमध्ये Baldur's Gate 3 या व्यतिरिक्त अॅलन वेक 2, मार्व्हल्स स्पायडर-मॅन 2, रेसिडेंट इव्हिल 4, सुपर मारियो ब्रोस वंडर आणि दि लेजंड ऑफ झेल्डा : टिअर्स ऑफ दि किंगडम या गेम्सना मानांकन मिळालं होतं. मात्र, या सर्वांवर मात करत गेट 3 गेमने विजय मिळवला. स्पायडर-मॅन 2 या बहुचर्चित गेमला सात नामांकने होती, मात्र त्यांना एकही पुरस्कार मिळवता आला नाही.
याव्यतिरिक्त Baldur's Gate 3 गेमला बेस्ट परफॉर्मन्स (Neil Newbon) बेस्ट कम्युनिटी सपोर्ट, बेस्ट मल्टिप्लेयर गेम, बेस्ट आरपीजी आणि बेस्ट प्लेयर्स व्हॉईस या कॅटेगरींमध्ये पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कार सोहळ्यानंतर लगेच लॅरियन स्टुडिओजने ही गेम Xbox वर लाँच केली. गेमर्ससाठी हे एक खास सरप्राईज ठरलं.
सर्वोत्कृष्ट गेम दिग्दर्शन या कॅटेगरीमध्ये Alan Wake 2, Baldur’s Gate 3, Marvel’s Spider-Man 2, Super Mario Bros. Wonder आणि The Legend of Zelda: Tears of the Kingdom या गेम्स होत्या. यांपैकी अॅलन वेक 2 या गेमने हा पुरस्कार पटकावला.
बेस्ट अॅडाप्टेशन - दि लास्ट ऑफ अस (प्लेस्टेशन प्रॉडक्शन/एचबीओ)
बेस्ट नरेटिव्ह - अॅलन वेक 2 (रेमेडी एंटरटेन्मेंट/एपिक गेम पब्लिशिंग)
बेस्ट आर्ट डिरेक्शन - अॅलन वेक 2
बेस्ट स्कोअर अँड म्युझिक - फायनल फँटसी XVI (कंपोझर - मासायोशी सोकेन)
बेस्ट ऑडिओ डिझाईन - हाय-फाय रश (टँगो गेमवर्क्स)
इनोव्हेशन इन अॅक्सेसिबिलिटी - फोर्झा मोटरस्पोर्ट (टर्न 10 स्टुडिओज)
गेम्स फॉर इम्पॅक्ट - चिया (Tchia)
बेस्ट ऑनगोइंग गेम - सायबरपंक 2077 (CD प्रोजेक्ट रेड)
बेस्ट इंडिपेंडंट गेम - सी ऑफ स्टार्स (सॅबोटाज स्टुडिओज)
बेस्ट डेब्यू इंडी गेम - ककून (जिओमॅट्रिक इंटरॅक्टिव्ह/अन्नपूर्णा इंटरॅक्टिव्ह)
बेस्ट मोबाईल गेम - Honkai : Star Rail
बेस्ट व्हीआर/एआर गेम - रेसिडेंट इव्हिल व्हिलेज व्हीआर मोड
बेस्ट अॅक्शन गेम - आर्मर्ड कोअर 6 : फायर्स ऑफ रुबिकॉन
बेस्ट अॅक्शन अॅडव्हेंचर गेम - दि लेजंड ऑफ झेल्डा : टिअर्स ऑफ दि किंगडम
बेस्ट फायटिंग गेम - स्ट्रीट फायटर 6
बेस्ट फॅमिली गेम - सुपर मारियो ब्रदर्स वंडर
बेस्ट सिम/स्ट्रॅटजी गेम - पिकमिन 4
बेस्ट स्पोर्ट/रेसिंग गेम - फोर्झा मोटरस्पोर्ट (टर्न 10 स्टुडिओज)
बेस्ट अँटिसिपेटेड गेम - फायनल फँटसी 8 रिबर्थ (स्क्वेअर एनिक्स)
बेस्ट कंटेंट क्रिएटर ऑफ दि इयर - आयर्नमाऊस
बेस्ट इस्पोर्ट गेम - Valorant
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.