Redmi Note 10T 5G  Google
विज्ञान-तंत्र

30 हजार रुपयांपेक्षा कमीत बेस्ट 5G फोन शोधताय? हे आहेत ऑप्शन्स

सकाळ डिजिटल टीम

सध्या अनेक स्मार्टफोन निर्माता कंपन्या त्याचे 5G फोन बाजारात लॉंच करत आहेत. अशात जर तुम्ही देखील 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Xiaomi, OnePlus, Oppo, Realme सारख्या ब्रॅण्डचे 5G स्मार्टफोन ऑप्शन्स भारतीय बाजारात उपलब्ध आहेक. आज आपण अशा काही स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत ज्यांची किंमत ही 30,000 रुपयांपेक्षा कमी आहे.

1. Redmi Note 10T 5G

Redmi Note 10T 5G स्मार्टफोनची किंमत 4GB+64GB स्टोरेज व्हेरियंटसाठी 14,999 रुपये आणि 6GB+128GB स्टोरेज व्हेरियंटसाठीची किंमत 16,999 रुपये आहे. हा फोन MIUI वर आधारित Android 11 वर काम करतो. यात 6.5-इंच फुल-एचडी+ डिस्प्ले, ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 700 चिपसेट आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे ज्यात 48-मेगापिक्सलचा प्रायमरी 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आहे.

2. Realme X7 Max 5G

Realme X7 Max 5G स्मार्टफोन भारतात दोन स्टोरेज व्हेरियंटमध्ये येतो, ज्यामध्ये 8GB+128GB मॉडेलची किंमत 26,999 रुपये आहे. तर 12GB + 256GB स्टोरेज मॉडेल 29,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यात 6.43-इंच फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले, मीडियाटेक डायमेन्सिटी 1200 प्रोसेसर, अँड्रॉइड 11 आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. फोनमध्ये 64MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 16MP सेल्फी कॅमेरा आहे.

.

3. OnePlus Nord 2 5G

OnePlus Nord 2 5G च्या 6GB + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 27,999 रुपये असून 8GB+128GB स्टोरेज आणि 12GB+256GB स्टोरेज वेरिएंट अनुक्रमे 29,999 आणि 34,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. वनप्लस नॉर्ड 2 5G स्मार्टफोन ऑक्सिजनओएस आधारित अँड्रॉइड 11, 6.43-इंच फुल एचडी+फ्लुइड एमोलेड डिस्प्ले, ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंसिटी 1200-एआय आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप (50 एमपी+8 एमपी+2 एमपी) सह येतो. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि 4,500mAh ची बॅटरी मिळते.

4. Xiaomi Mi 11X 5G

Xiaomi Mi 11X 5G ची किंमत 6GB+128GB व्हेरियंट साठी 27,999 रुपये आणि 8GB+128GB व्हेरियंट साठी 28,999 रुपये आहे. फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 5G चिपसेट, 6.67-इंच फुल HD+ AMOLED डॉट डिस्प्ले, 4520mAh बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह 20MP फ्रंट कॅमेरा 48MP, 8MP अल्ट्रा-वाइड सेंसर आणि 5MP मॅक्रो सेन्सरसह येतो.

5. Oppo Reno 6 5G

Oppo Reno 6 5G स्मार्टफोन सिंगल व्हेरियंटमध्ये 8GB + 128GB स्टोरेजसह येतो. फोनची किंमत 29,990 रुपये असून Oppo Reno 6 5G मध्ये 6.43-इंच फुल HD+ AMOLED डिस्प्ले, ColorOS 11.3 आधारित Android 11, MediaTek Dimensity 900 चिपसेट, 4300mAh बॅटरी आणि 64-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर असलेले ट्रिपल रियर कॅमेरे, 8-मेगापिक्सलचे अल्ट्रावाइड लेंस आणि 2-मेगापिक्सलचे मॅक्रो लेन्स देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who Is Maharashtra CM: शिंदेंना मान्यता मिळणार की फडणवीस महाराष्ट्राची कमान सांभाळणार? मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण पुढे?

मंगळवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी! सोलापूर जिल्ह्यातील एका आमदाराला मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाची संधी? विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुखांची नावे चर्चेत

Sakal Podcast: महायुतीचा महाविजय, मविआचा धुव्वा ते शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना!

Panchang 24 November: आजच्या दिवशी श्री सूर्यांय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

आजचे राशिभविष्य - 24 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT