Best 5G Smartphones: टेलिकॉम कंपन्यांनी काही दिवसांपूर्वीच भारतात ५जी सेवा सुरू केली आहे. तुम्ही देखील ५जी स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात कमी बजेटमध्ये येणारे अनेक शानदार हँडसेट्स उपलब्ध आहे. तुम्ही अवघ्या १२ हजारांच्या बजेटमध्ये Lava Blaze 5G, Infinix Hot 20 5G फोनला खरेदी करू शकता. या दोन्ही फोनपैकी कोणता फोन बेस्ट आहे, ते जाणून घेऊया.
डिस्प्ले
Lava Blaze 5G फोनमध्ये ६.५२ इंच IPS LCD डिस्प्ले देण्याता आला असून, याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. तर इनफिनिक्स हॉट २० ५जी मध्ये ६.५८ इंच IPS LCD डिस्प्ले देण्यात आला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. दोन्ही स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह येतात.
स्टोरेज
Lava Blaze 5G मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंसिटी ७०० चिपसेटसह ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळेल. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवू शकता. तर Infinix Hot 20 5G स्मार्टफोन ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंसिटी ८१० प्रोसेसरसह येतो. यामध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे.
कॅमेरा
लावाच्या फोनमध्ये रियरला ५० मेगापिक्सल प्रायमरी सेंसर + २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर मिळतो. तर इनफिनिक्सच्या फोनमध्ये रियरला ५० मेगापिक्सल + एआय लेंस मिळेल.सेल्फी व व्हीडिओ कॉलिंगसाठी दोन्ही फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
हेही वाचा: Online Shopping: फ्लिपकार्टला दणका! वेळेवर डिलिव्हरी न केल्याने ठोठावला ४२ हजारांचा दंड
बॅटरी
लावा आणि इनफिनिक्सच्या फोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. इनफिनिक्सचा फोन १८ वॉट चार्जिंग सपोर्ट, तर लावाचा फोन १० वॉट चार्जिंग सपोर्टसह येतो.
किंमत
Lava Blaze 5G च्या ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये आहे. तर Infinix Hot 20 5G च्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटला तुम्ही ११,९९९ रुपयात खरेदी करू शकता.
हेही वाचा: ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.