विज्ञान-तंत्र

वाचनासोबत ऐकण्याचा आनंद! दर्जेदार मराठी पुस्तकांसाठी डाऊनलोड करा हे अ‍ॅप

शरयू काकडे

वाचाल तर वाचाल ! (Read) ही म्हण तुम्ही बऱ्याचदा ऐकली असेल पण खरचं कधी गांभीर्याने विचार केला आहे का याचा? वाचनाचे महत्त्व (Importance Of Reading)आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते, आपण विचार करू लागतो, आपली कल्पनाशक्ती देखील वाढते, आपल्याला नवीन गोष्टी करण्याची प्रेरना मिळते. शाळा कॉलेजमध्ये अभ्यास करताना वाचलेली पुस्तकं(Books) आणि वृत्तपत्र (Newspaper) सोडलं तर आता आपण काहीच वाचत नाही.

रोजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये पुस्तक हातात घेऊन, निवांत वाचन करायाला, त्यांचे चिंतन आणि मनन करायाला हवा तितका वेळ मिळतं नाही... हे खरं आहे पण, तुम्ही त्या मोबाईलवर सोशल मिडिया आणि इतर माध्यामांवर टाईमपास करण्यात दिवसभरातील किती वेळ वाया घालवता याचा कधी विचार केलाय का? तुम्ही सोशल मिडियावर (Social Media) रोज हजारो पोस्ट वाचता पण, त्यामुळे तुमच्या ज्ञानात खरचं भर पडते का? याचाही विचार करायला हवा. तोच वेळ जर तुम्ही मोबाईलवर(Mobile) पुस्तक वाचण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी घालवला तर नक्कीच तुमच्या ज्ञानात भर पडेल आणि तुमच्या वेळेचा सदउपयोग होईल. (best app to read and Listen books in Marathi)

तुम्ही म्हणाल मराठी भाषेतील पुस्तकं मोबाईलवर कुठे मिळणार? कुठे शोधायचं? तुम्ही त्याची काळजी करू नका. आम्ही तुम्हाला आज अशा काही अ‍ॅपबद्दल माहिती देणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही तुमची पुस्तक वाचण्याचा छंद आनंद जोपासू शकता.

मराठी भाषेतील दर्जेदार साहित्य वाचा आणि ऐका! डाऊनलोड करा हे अ‍ॅप (v)

  • स्टोरी टेल ( Story Tell) : वाचा, ऐका

  • किंडल आणि (ऑडिएबल) Kindle & Audible : वाचा, ऐका

  • स्नोवेल (Snovel) : ऐका

  • प्रतिलिपी (Pratilipi) : वाचा, ऐका

  • गुगल प्ले बुक्स (Goolgle Play Books) : वाचा, ऐका

  • मराठी पुस्तकालय (Marathi books and Sahitya) : वाचा

स्टोरी टेल ( Story Tell) :

स्टोरी टेल अ‍ॅपवर पुस्तके वाचता आणि ऐकता येतात. भरपूर भरपूर प्रसिध्द आणि लोकप्रिय पुस्तकांचा खजिना येथे उपलब्ध आहे. दरम्यान याअ‍ॅपवर पुस्तक वाचण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी शुल्क मासिक आकारले जाते. या अ‍ॅपवर इतर भाषेतील पुस्तक देखील उलब्ध आहे पण त्याप्रमाणे शुल्क आकारले जाते. त्याकाळात तुम्ही हवे तितकी पुस्तके वाचू शकता तसेच पुस्तक, टॉक शॉ, पॉडकास्ट देखील ऐकू शकता.

किंडल आणि (ऑडिएबल) Kindle & Audible :

अॅमझॉनच्या किंडल यॅ अपवर तुम्हाला मराठीसह इतर भाषेतील भरपूर प्रसिद्ध आण लोकप्रिय पुस्तकांचा खजिना येथे उपलब्ध आहे. पण तुम्हाला प्रत्येक पुस्तकाचेश(Ebook) शुल्क विकत घ्यावे लागते आणि मग वाचता येते आणि तुमच्या अ‍ॅपच्या लायब्ररीमध्ये ते ठेवता येते. अॅमझॉनचे ऑडिओबल हे ऑडिओ बुक्ससाठीचे अ‍ॅप देखील आहेत त्यावर तुम्हाला तुमच्या आवडीची पुस्कते वाचायला मिळतील. पण त्यासाठी तुम्हाला त्या अ‍ॅपचे सबस्क्रिपशन घ्यावे लागते म्हणजे त्यासाठी तुम्हाला मासिक शुल्क आकारले जाते. त्याकाळात तुम्ही हवी ती पुस्तक, पॉडकास्ट, टॉक शॉ ऐकू शकता. ऑडिओबलवर अद्याप मराठी पुस्तक उपलब्ध नाही पण मराठी टॉक शो, पॉडकास्ट उपलब्ध आहे.

स्नोवेल (Snovel) :

स्नोवेल हे राठी भाषेतील ऑडिओबुक, पॉडकास्ट, टॉक शो अशा श्राव्यानुभव देणारे अ‍ॅप आहे. या अ‍ॅपवर तुम्हाला सर्व वयोगटातील लोकांसाठी विविध उपक्रम ऐकण्यासाठी उपलब्ध आहे. विशेषत: लहान मुलांना ऐकता येतील अशा गोष्टी, कविता, किस्से देखील उपलब्ध आहेत. एक महिना, तीन महिने किंवा एक वर्षांसाठी या मर्यादेनुसार प्रतिदिवसाचे शुल्क आकारले जाते.

प्रतिलिपी (Pratilipi) :

प्रतिलिपी या अ‍ॅपवर मराठी भाषेत तुम्हाला नवोदित लेखकांनी लिहलेल्या लघुकथा, कथा, पुस्तके, कविता वाचायला मिळतील. तसेच या अ‍ॅपवर तुम्ही स्वत: या कथा, कविता वाचू किंवा लिहू शकता. या अ‍ॅपवर प्रमियिम कंटेट वाचण्यासाठी वेगळे सबस्क्रिपशन घ्यावे लागते. तुम्हाला जर या कथा वाचायच्या असतील तर प्रतिलिपी एफएम (Pratilipi FM) हे वेगळे अ‍ॅप डाऊलोड करु शकता आणि तुम्हाला कॉमिक्स बुक्स वाचायाला आवडत असतील तर प्रतिलिपी कॉमिक्स(Pratilipi Comics) हे अ‍ॅप डाऊनलोड करू शकता.

गुगल प्ले बुक्स (Google Play Books) :

हे अ‍ॅपवर इबुक्स आणि ऑडिओ बुक्स खरेदी करुन वाचता येतात. या अ‍ॅपवर मराठीभाषेतील बरेच ऑडिओबुक्स आहे जे तुम्ही विकत घेऊन वाचू शकता. मराठीशिवाय इंग्रजी मधील पुस्तक, कॉमिक बुक खरेदी करून वाचू आणि ऐकू शकता.

मराठी पुस्तकालय (Marathi books and Sahitya) :

या अ‍ॅपवर फक्त मराठीभाषेतील पुस्तक उपलब्ध आहेत तेही मोफत. तुम्हाला हवे ते पुस्कत तुम्ही या अ‍ॅप डाऊनलोड करू शकता. मराठी कांदबऱ्या, इंग्रजी कांदबऱ्यांचे अनुवाद, लघूकथा अशा विविध प्रकारची इबुक्स येथे मोफत उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT