Car Sakal
विज्ञान-तंत्र

Electric Cars: कमी बजेटमध्ये इलेक्ट्रिक कार शोधताय? 'ही' लिस्ट पाहून त्वरित कराल खरेदी

भारतीय बाजारात एकापेक्षा एक शानदार इलेक्ट्रिक कार उपलब्ध आहेत. या कार्सची किंमत १० लाखांपेक्षा कमी आहे.

सकाळ डिजिटल टीम

Best Electric Cars in India: पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे अनेकजण इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याला प्राधान्य देत आहे. सरकार देखील सातत्याने पॉलिसीमध्ये बदल करत इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहेत. ग्राहकांची मागणी पाहता कंपन्यांकडून देखील नवीन इलेक्ट्रिक कार्सला लाँच केले जात आहे. तुम्ही देखील इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी अशाच ४ शानदार कारविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Tata Tiago EV

Tata Tiago EV

टाटाने काही महिन्यांपूर्वीच Tiago EV ला लाँच केले आहे. ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असल्याचा कंपनीने दावा केला होता. कारच्या बेस मॉडेलची किंमत ८.४९ लाख रुपये, तर टॉप व्हेरिएंटची किंमत ११.७९ लाख रुपये आहे. सिंगल चार्जमध्ये कार सहज २५० किमी अंतर पार करू शकते.

Mahindra E Verito

Mahindra E Verito

देशातील पहिली इलेक्ट्रिक सेडान म्हणून महिंद्राने ई-व्हेरिटोला २०१६ मध्ये लाँच केले होते. ही कार एकदा चार्ज केल्यावर ११० किमी अंतर पार करू शकते. ई-व्हेरिटोची एख्स-शोरुम किंमत ९.४६ लाख रुपये आहे. कंपनी कारच्या टेक्नोलॉजीमध्ये देखील आता बदल करणार आहे, ज्यामुळे याच्या रेंजमध्ये वाढ होईल.

PMV Electric EaS-e

PMV Electric EaS-e

PMV Electric या स्टार्टअपने काही दिवसांपूर्वीच EaS-e या इलेक्ट्रिक कारला लाँच केले आहे. या कारची एक्स-शोरुम किंमत ४.७९ लाख रुपये आहे. ही २ सीटर कार आहे. एकदा चार्ज केल्यावर कार १६० ते १८० किमी धावू शकते. ही कार आकारने लहान असण्यासोबतच अनेक शानदार फीचर्ससह येते. कारमध्ये फ्रंट एलईडी बार, एलईडी टेल लाइट, रिमोट पार्किंग असिस्ट, क्रूझ कंट्रोल, रिमोट कनेक्टिव्हिटी, ब्लूटूथ आणि नेव्हिगेशन सारखे फीचर्स मिळतील.

MG Car

एमजी लाँच करणार नवीन कार

एमजी लवकरच भारतीय बाजारात नवीन ई-कार लाँच करणार आहे. कंपनी २०२३ मध्ये एमजी एयरवर आधारित ई-कारला भारतात लाँच करेल. या कारच्या किंमत आणि नावाबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. परंतु, कारची किंमत १० लाख रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. ही टियागो सारख्या कारला टक्कर देईल. तुम्ही जर एमजीची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही दिवस वाट पाहणे फायद्याचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

Chh.Sambhajinagar: इम्तियाज जलीलांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल; मतदानाच्या दिवशी झाला होता वाद

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT