Best English Learning App 
विज्ञान-तंत्र

तुम्हाला इंग्लिश शिकायचंय का? 2021 मध्ये ठरले अ‍ॅप बेस्ट

सकाळ डिजिटल टीम

तुम्हाला इंग्लिश(English) शिकायचे आहे का? मग तुमचा फोनच तुम्हा बेस्ट गाईड ठरू शकतो. होय, बरोबर ऐकलंत तुम्ही. तुमचा फोनच तुम्हाला आता इंग्लिश शिकण्यासाठी मदत करू शकतो. तुम्हाला मोबाईलवर कित्येक अॅप(English learning apps) उपलब्ध आहे ज्यामुळे तुम्हाला सहज इंग्रजी शिकता येईल. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात, घरी बसून इंग्लिश शिकणे खरोखरच सोयीचे झाले आहे. केवळ घरीच नाही तर कुठेही - प्रवास करताना किंवा कॉफी शॉपमध्ये बसूनही तुम्ही इंग्लिश शिक शकता. Lookback 2021

इंग्रजी शिकणे म्हणजे फक्त ऑनलाईन व्याकरणाचे नियम शिकणे एवढेच नाही तर इंग्लिश बोलण्यासाठी एक पार्टनर देखील मिळतो, किंवा इंग्लिश शिकणारा दुसरा व्यक्ती ज्यासोबत तुम्ही इंग्लिश भाषेचा सराव करू शकता. पण सध्या आव्हानात्मक गोष्ट ही आहे की, इंटरनेटवर हजारो इंग्लिश शिकण्यासाठीचे अॅप्स उपलब्ध आहेत, परंतु तुम्हाला सर्वोत्तम इंग्रजी शिकणारे अॅप निवडावे लागेल. एक इंग्रजी शिक्षण अॅप जे तुम्हाला खरोखर फायदेशीर ठरू शकते.

इंग्लिश भाषा शिकणाऱ्यांना नेहमी सल्ला जातो असे इंग्लिश शिकण्यासाठीचे ५ अॅप ( top 5 English learning apps )

इंग्वार्ता( EngVarta)

तुम्हाला खरोखर इंग्लिश भाषा शिकायची असेल आणि तुम्हाला इंग्रजी भाषेत संभाषण करता येईल असा ऑनलाईन पर्याय तुम्हाला हवा असेल तर इंग्वार्ता( EngVarta) या अॅपचा वापर तुम्ही करू शकतो. या अॅपवर तुम्ही दररोज इंग्लिश बोलण्याचा सराव करू शकता. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही तुमचे इंग्लिश सुधारू शकता. तुम्हाला जर इंटरव्हू द्यायचा आहे पण त्यामध्ये तुमचे तोडक मोडक इंग्लिश अडथळा ठरतेय तर तुम्ही नक्कीच हे अॅप वापरू शकता. तुम्हाला लोकांसमोर इंग्लिश भाषेमध्ये बोलायचे असेल किंवा प्रझेंटेशन करायचे असेल तर तुम्हाला नक्कीच हे अॅप उपयोगी ठरू शकते. तुम्हाला इंग्लिश भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर तुम्ही या अॅप द्वारे इंग्लिश भाषा शिकू शकता. या इंग्रजी अॅपमध्ये तुम्हाला स्वत:चे नाव सांगण्याची गरज नाही. तुम्ही सर्वांपासून तुमचे नाव गुपित ठेवू शकता.

ड्युओलिंगो (Duolingo)

ड्युओलिंगो हे आधुनिक इंग्लिश लर्निंग अॅपपैकी एक आहे जिथे तुम्ही इंग्लिशसह अनेक भिन्न भाषा शिकू शकता. ड्युओलिंगो हे अॅपमध्ये शब्द, वाक्य, वाक्यप्रचारांचा ऐकून सराव करता येतो. ड्युओलिंगोमध्ये लर्न विथ लोकल्स नावाचे फिचर्स देखील आहे जे स्थानिक भाषिकांच्या इंग्लिश शब्द व्हिडिओतून जोडू शकते. शब्द मोठ्याने उच्चारणे आणि त्यांचे प्रात्यक्षिक देखील तुम्हाला या अॅपवर करता येते. ड्युओलिंगो पूर्णपणे अॅक्टिव्हिटी बेस्ड शिक्षणावर आधारित आहे. ज्यांना इंग्लिश शिकायचे आहे अशी प्रत्येक व्यक्ती हे अॅप वापरू शकते आणि स्वत:चा शब्दसंग्रह वाढवू शकते आणि स्वत:ची चाचणी घेऊ शकते. तसेच या अॅपवर तुम्ही इंग्लिश भाषेत बोलण्याचा सराव करू शकता.

इंग्लिश कन्वर्सेशन प्रॅक्टिस अॅप (English Conversation Practice App)-

'इंग्लिश कन्वर्सेशन प्रॅक्टिस अॅप' हे नावप्रमाणे कामही करते. ज्यांना इंग्रजी संभाषणाचा सराव करायचा आहे त्यांच्यासाठी हे अॅप खूप फायदेशीर आहे. तुम्हाला येथे कोणीही लाईव्ह संभाषणासाठी पार्टनर मिळणार नाही तरी हे अॅप खूप उपयूक्त आहे. हे अॅप तुम्हाला इंग्लिश भाषेचा उच्चार सुधारण्यासाठी आणि सराव करण्यासाठी मदत करते. 'ऐका, समजून घ्या आणि सराव' करा या तत्वावर हे अॅप काम करते.

फ्युएंट यू (Fluent U)

Fluent U हे इंग्लिश शिकण्याचे असे अॅप आहे जिथे तुम्ही वास्तविक जगातील व्हिडिओ आणि सबटाईटल वापरून सराव करू शकता. तुम्हाला त्यासाठी व्याकरणाचे धडे देणारे व्हिडिओ सापडणार नव्हे तर जाहिराती, संगीत, मुलाखती, विनोदी, भाषणे आणि बरेच काही यासारखे वास्तविक जीवनातील संभाषणांचे व्हिया व्हिडिओंसोबत क्विझ( Quizzes) आहेत जिथे तुम्ही स्वतःची चाचणी घेऊ शकता आणि त्या व्हिडिओंमध्ये पाहून आणि ऐकून त्या इंग्रजीचा सराव करू शकता. तुम्ही जर युट्युबवर वेळ घालवात असाल तर त्याऐवजी तुम्ही तो वेळ येथे वापरून तुम्ही तुमची इंग्लिश भाषा सुधारू शकता

ग्रामरली (GRAMMARLY)

हे अॅप इंग्रजी शिकणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या अॅपच्या मदतीने तुम्ही तुमच्या लेखना होणाऱ्या चूका टाळू शकता किंवा आणखी प्रभावीपणे लिहू शकता. कित्येकदा इंग्लिश भाषेत लिहताना व्याकरणामध्ये काही चूका होतात, त्या सुधारण्यासाठी हे अॅप मदत करते.

भारतात वापरले जाणारे टॉप 10 इंग्लिश लर्निंग अॅप 2021 (List of Top 10 English Learning App in India 2021)

  • इंग्वार्ता (ENGVARTA)

  • ड्युओलिंगो (Duolingo)

  • हॅलो टॉक ( HELLO TALK)

  • ग्रामरली (GRAMMARLY)

  • फ्लूएंट यू (Fluentu)

  • मेस्मराईज( Memrise)

  • कॅम्बली (Cambly)

  • ईएलसी इंग्लिश लर्निंग अॅप (ECL English learning app

  • बॅबेल (Babbe)

  • एनगुरु (Enguru)

Android मोबाईलवर इंग्लिश भाषा शिकाण्यासाठी 10 अॅप्सची यादी (Top 10 Best English Learning Apps for Android 2021)

  • इंग्वार्ता (ENGVARTA)

  • ड्युओलिंगो (Duolingo)

  • मेस्मराईज( Memrise)

  • बुस्सू( Bussu)

  • बीबीसी लर्निंग इंग्लिश (BBC Learning English)

  • हॅलो इंग्लिश (Hello English)

  • इंग्लिश कन्वर्सेशन प्रॅक्टिस अॅप (English Conversation practice)

  • फ्लूएंट यू (Fluentu)

  • बॅबेल (Babbel)

  • एनगुरु (Enguru)

Android मोबाईलवर इंग्लिश भाषा शिकाण्यासाठी 10 अॅप्सची यादी (Top 10 Best English Learning Apps for Android 2021)

इंग्वार्ता (ENGVARTA)

ड्युओलिंगो (Duolingo)

मेस्मराईज( Memrise)

बुस्सू( Bussu)

बीबीसी लर्निंग इंग्लिश (BBC Learning English)

हॅलो इंग्लिश (Hello English)

इंग्लिश कन्वर्सेशन प्रॅक्टिस अॅप (English Conversation practice)

फ्लूएंट यू (Fluentu)

बॅबेल (Babbel)

एनगुरु (Enguru)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT