best over the ear headphones  
विज्ञान-तंत्र

भारतात ५ हजारांत मिळणारे बेस्ट 'ओव्हर-द-इअर' हेडफोन; पाहा यादी

सकाळ डिजिटल टीम

best over the ear headphones : तुम्ही तुमची आवडती गाणी ऐकताना किंवा वेब सीरिज पाहतान, जर तुमचे हेडफोन चांगले असतील तर मनोरंजनाची मजाही दुप्पट होते. जर तुम्ही बजेटमध्ये बेस्ट साऊंड क्वालिटी हेडफोन शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सध्या वायरलेस इयरफोन्सचा वापर हळूहळू वाढताना दिसतोय, पण गेमर, संगीतकार आणि अगदी सामन्य वापरकर्ते देखील तुम्हाला सांगू शकतील की ओव्हर-द-इअर हेडफोन्स बेस्ट साऊंड इक्सपिरिएंस देतात.

ओव्हर-द-इअर हेडफोन्स खरेदी करण्याठी आता भरमसाठ किंमत मोजवी लागत नाही, अगदी 5,000 रुपयांच्या किंमतीच्या रेंजमध्ये बरेच पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. आज आपण भारतीय बाजारपेठेतील 5,000 रुपयांच्या खाली मिळणारे काही सर्वोत्तम ओव्हर-द-इअर हेडफोन्स पाहाणार आहोत

1. Sennheiser HD 400s

Sennheiser HD 400s हे वायर्ड ओव्हर-द-इअर हेडफोन आहेत ज्यांची किंमत 4,574 रुपये आहे आणि Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध आहेत. हेडफोन्स 18Hz - 20,000Hz च्या फ्रिक्वेंसी रिस्पॉंस रेंजसह येतात. हेडफोन तुमच्या व्हिडिओ कॉल्स आणि गेमिंग सेटअप साठी बिल्टइन माइकसह येतात आणि फोल्डेबल डिझाइन मध्ये येतात ज्यामुळे ते कोणत्याही बॅकपॅक किंवा ड्रॉवरमध्ये सहजपणे बसू शकतात.

2. Shure SRH240A - या हेडफोन्सची किंमत 4,999 रुपये आहे . हेडफोन 40mm डायनॅमिक ड्रायव्हर्ससह येतात आणि याला क्लोज बॅक डिझाइन मिळते, हेडफोन्स 20Hz - 20,000 Hz च्या फ्रिक्वेंसी रिस्पॉंस रेंजसह येतात. Shure SRH420A मध्ये बिल्टइन मायक्रोफोन येत नाही.

3. Audio Technica ATH M20X - या हेडफोन्सची किंमत भारतात 4,599 रुपये आहे. हेडफोन 40mm डायनॅमिक ड्रायव्हर्ससह येतात आणि यामध्ये क्लोज बॅक डिझाइन मिळते. 15Hz - 20,000Hz ची फ्रिक्वेंसी रिस्पॉंस रेंजसह येतात आणि यामध्ये देखील तुम्हाला बिल्टइन मायक्रोफोन मिळतो.

4. Jays X-Five - हे वायरलेस ओव्हर-द-इअर हेडफोन आहेत ज्यांची किंमत भारतात 3,499 रुपये आहे. हेडफोन 35Hz ते 18,000Hz च्या फ्रिक्वेंसी रेंजसह येतात आणि यामध्ये बिल्टइन मायक्रोफोन देण्यात आला आहे. Jays X-Five मध्ये 40mm डायनॅमिक ड्रायव्हर्स देखील देण्यात आले आहेत आणि ते वायरलेस मोडमध्ये 20 तासांपर्यंत बॅटरी लाइफ देतात.

5. JBL Tune 700BT - या वायरलेस ओव्हर-द-इअर हेडफोन्सची किंमत आहे 4,699 रुपये आणि हे Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हेडफोन 27 तासांपर्यंत बॅटरी लाइफसह येतात आणि मोबाईल डिव्हाइससाठी व्हॉइस असिस्टंट सपोर्टसह येतात. हेडफोन 20Hz - 20,000Hz फ्रिक्वेंसी रेंज आणि इनबिल्ट माइक देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT