Smartphone Sakal
विज्ञान-तंत्र

Bestseller Phone: 'हा' आहे भारतातील सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन, किंमत-फीचर्सने ग्राहकांना लावले वेड

ग्लोबल टेक्नोलॉजी मार्केट रिसर्च फर्म Counterpoint Research ने भारतातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन्सची लिस्ट जारी केली आहे. या लिस्टमध्ये आयफोन टॉपवर आहे.

सकाळ डिजिटल टीम

Best Selling Mobile Phones in India : भारतीय बाजारात दर आठवड्याला एकापेक्षा एक शानदार स्मार्टफोन लाँच होतात. बाजारात एवढे हँडसेट्स उपलब्ध आहेत की कोणता खरेदी करावा, हे लक्षात येत नाही. तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला अशाच बेस्टसेलर हँडसेट्सबद्दल माहिती देत आहोत.

ग्लोबल टेक्नोलॉजी मार्केट रिसर्च फर्म Counterpoint Research ने भारतातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन्सची लिस्ट जारी केली आहे. या लिस्टमध्ये गेल्यावर्षीच्या शेवटच्या तिमाहीत सर्वाधिक विक्री झालेल्या फोनची माहिती देण्यात आली आहे. या लिस्टमध्ये Apple iPhone 13 टॉपवर आहे.

Samsung Galaxy M13 दुसऱ्या स्थानावर

२०२२ च्या तिसऱ्या तिमाहीत Apple iPhone 13 हा सर्वाधिक विक्री झालेला स्मार्टफोन ठरला आहे. फोनची बाजारातील हिस्सेदारी ४ टक्के होती. तर दुसऱ्या स्थानावर Samsung Galaxy M13 स्मार्टफोन आहे. या फोनला देखील ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.

लिस्टमध्ये Xiaomi चा सब-ब्रँड Redmi ने देखील स्थान मिळवले आहे. Xiaomi Redmi A1 स्मार्टफोन तिसऱ्या स्थानावर आहे. या लिस्टमध्ये Samsung Galaxy A04s आणि Realme C35 हे क्रमशः चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहे.

आयफोन टॉपवर

रिपोर्टनुसार, iPhone 13 व्यतिरिक्त इतर फोन्सचा मार्केट शेअर ३ टक्के आहे. पहिल्यांदाच iPhone 13 भारतीय बाजारातील टॉप सेलिंग स्मार्टफोन ठरला आहे. भारतीय बाजारात कमी किंमतीत येणाऱ्या बजेट स्मार्टफोन्सला सर्वाधिक पसंती मिळते. मात्र, यावेळी आयफोनने अनेक बदल केले आहेत.

दरम्यान, ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोर्सवर iPhone १३ बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे. यामुळेच फोनला ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या फोनमध्ये ए१५ बायोनिक चिपसेटचा सपोर्ट मिळतो. याशिवाय, १२ मेगापिक्सल ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनला डिस्काउंटसह ६० हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता.

हेही वाचा: Digi Yatra: विमानतळावरच्या वेटिंगने चिडचिड होते? सरकारचं App ठरणार तारणहार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

दारूच्या नशेतच कपूर परिवाराला पहिल्यांदा भेटली संजय कपूरची बायको ; म्हणाली "ड्रिंक्स करताना त्याने प्रपोज केलं"

SCROLL FOR NEXT