Honda Activa Best Selling Scooter  esakal
विज्ञान-तंत्र

Honda Activa ठरली देशातील सर्वोत्तम स्कूटर, ३० दिवसांत सव्वा लाखांची विक्री

भारतात होंडाची स्कूटर ठरली सर्वोत्तम

सकाळ डिजिटल टीम

जर तुम्हाला नवीन स्कूटर खरेदी करायची इच्छा आहे. पण बाजारात इतके पर्याय उपलब्ध आहेत. त्यातून कोणती स्कूटर पसंत करावी? जानेवारी २०२२ च्या बेस्ट सेलिंग स्कूटरविषयी (Scooter) जाणून घ्या. ती देशातील बेस्ट सेलिंग स्कूटर बनली आहे. आम्ही बोलत आहोत होंडा अॅक्टिव्हाविषयी. तिचे आकडे कंपनीने जारी केले आहे. आकड्यांनुसार कंपनीने जानेवारी २०२२ मध्ये या होंडा अॅक्टिव्हाची १ लाख १३ हजार २३४ युनिटची विक्री केली आहे. जर तुम्ही देशातील बेस्ट सेलिंग स्कूटर बनलेली होंडा (Honda) अॅक्टिव्हा खरेदी इच्छित आहात. तर जाणून घ्या या स्कूटरची किंमत आणि फिचर्सविषयी... (Best Selling Scooter In January 2022 In India Honda Activa)

होंडा अॅक्टिव्हामध्ये कंपनीने १०९.५१ सीसीचे सिंगल सिलिंडर इंजिन दिले आहे. जे फ्युल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन ७.७९ पीएसचे पाॅवर आणि ८.७९ एनएमचे पीक टाॅर्क जनरेट करते. त्याबरोबर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दिले गेले आहे. स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टिममध्ये कंपनीने तिच्या फ्रंट व्हिलमध्ये ड्रम ब्रेक आणि रिअर व्हिलमध्ये डिस्क ब्रेकचे काॅम्बिनेश दिले आहे. त्याबरोबर अलाॅय व्हिल आणि ट्युबलेस टायरला जोडले गेले आहे. रस्त्यांवरील आरामदायक प्रवासासाठी तिच्या फ्रंटमध्ये टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि रिअरमध्ये प्रीलोड अॅडजस्टेबल मोनोशाॅक सस्पेन्शन दिले गेले आहे. मायलेजच्या बाबत कंपनीनुसार हे स्कूटर ६० किलोमीटर प्रतिलीटरचे मायलेज देते. हे मायलेजला एआरआय द्वारा प्रमाणित केले गेले आहे.

होंडा अॅक्टिव्हाच्या फिचर्सवर बोलाल तर त्यात इंजिन स्टार्ट स्टाॅप स्वीच, डबल लीड एक्सटर्नल प्युल फिल, सायलेंट स्टार्ट विथ एसीजी, ईएसपी टेक्नाॅलाॅजी, इंजिन किल स्वीच, फ्युल गाॅज, लो बॅटरी इंडिकेटर आणि पास लाईट आदी फिचर्स देण्यात आले आहेत. स्कूटरच्या बाॅडी स्ट्रक्चर म्हणाल, तिचे कर्ब वेट १०७ किलोग्रॅम आहे. त्याबरोबरच तिची लांबी १८३३ एमएम, रुंदी ६९७ एमएम, उंची ११५६ एमएम आणि १७१ एमएमचे ग्राऊंड क्लिअरन्स दिले गेले आहे. होंडा अॅक्टिव्हाला कंपनीने ७० हजार ५९९ रुपयांच्या किंमतीत बाजारात उतरवले आहे. ते टाॅप व्हेरिएंटमध्ये जाताच ७२ हजार ३४५ रुपये होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT