Father's Day Gifts eSakal
विज्ञान-तंत्र

Father's Day Gifts : आपल्या वडिलांना द्या हायटेक गिफ्ट; ही गॅजेट्स ठरतील कामाची!

उतारवयात गरजेच्या आणि उपयोगी असणाऱ्या काही गोष्टींची यादी आम्ही तयार केली आहे.

Sudesh

जून महिन्याचा तिसरा रविवार हा जगभरात फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. यावर्षीचा फादर्स डे १८ जून रोजी आहे. यानिमित्ताने तुम्ही आपल्या वडिलांना काय गिफ्ट देऊ शकता याबाबत आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत.

आपल्यापैकी बहुतांश लोकांच्या वडिलांचं वय आता वाढत चाललं आहे. त्यामुळे उतारवयात त्यांना गरजेच्या आणि उपयोगी असणाऱ्या काही गोष्टींची यादी आम्ही तयार केली आहे. यांपैकी एखादी गोष्ट तुम्ही आपल्या वृद्ध वडिलांना देऊन, हा फादर्स डे (Father's Day 2023) त्यांच्यासाठी स्पेशल करू शकता.

स्मार्टवॉच

स्मार्टवॉच वापरण्याचा ट्रेंड तरुणांमध्ये अधिक असला, तरी त्यातील कित्येक फीचर्स हे वृद्ध व्यक्तींसाठी फायद्याचे आहेत. हार्ट-रेट मॉनिटर, स्टेप काऊंटर आणि आरोग्यासंबंधी असे अनेक फीचर्स आजकाल स्मार्टवॉचमध्ये (Smart Watch) असतात. दोन ते तीन हजार रुपयांपासून चांगले स्मार्टवॉच मिळून जातात. त्यामुळे हे एक परफेक्ट गिफ्ट ठरू शकतं.

किंडल

आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या वडिलांना वाचनाची आवड असते. मात्र, वय झाल्यामुळे पुस्तकातील लहान फाँटमध्ये त्यांना वाचता येत नाही. अमेझॉनच्या किंडल पेपरव्हाईटवर (Kindle Paperwhite) मात्र तुम्ही झूम करून मोठ्या फाँटमध्ये पुस्तक वाचू शकता. त्यामुळे हे एक चांगलं गिफ्ट ठरू शकतं.

मोबाईल

आपल्या वृद्ध वडिलांना तुम्ही मोबाईल गिफ्ट करू शकता. अमेझॉनवर उपलब्ध असणारा Seniorworld Easyphone हा मोबाईल वृद्ध व्यक्तींसाठी अगदी फायद्याचा आहे. या मोबाईलमध्ये कॉलिंगसाठी फोटो बटन्स, कॉल ब्लॉकिंग, जीपीएस ट्रॅकर असे बरेच फीचर्स दिले आहेत. विशेष म्हणजे हा फोन अवघ्या साडेतीन हजार रुपयांना उपलब्ध आहे.

मसाजर

वृद्ध व्यक्तींच्या तक्रारींपैकी सर्वात मोठी तक्रार म्हणजे अंगदुखी. त्यामुळेच तुम्ही तुमच्या वडिलांना बॅक मसाजर, फुट मसाजर किंवा मसाजर चेअर (Massager) अशी एखादी गोष्ट नक्कीच गिफ्ट करू शकता.

की-फाईंडर

चाव्या हरवणे ही जवळपास सर्वच वृद्ध व्यक्तींची समस्या असते. यामुळेच तुम्ही आपल्या वडिलांना की-फाईंडर (Key Finder) गिफ्ट करू शकता. यामुळे हरवलेल्या चाव्या लगेच सापडतील. याव्यतिरिक्त तुम्ही आपल्या वडिलांना अ‍ॅपल एअर टॅग किंवा जिओ टॅग अशा गोष्टीही गिफ्ट करू शकता. यामुळे छोट्या-छोट्या गोष्टी शोधण्यात त्यांना अडचण येणार नाही.

सारेगामा कारवां

तुमच्या वडिलांना जर गाणी ऐकण्याची आवड असेल, तर सारेगामाचं कारवां (Saregama Carvaan) हे त्यांच्यासाठी परफेक्ट गिफ्ट ठरेल. यामध्ये एक रेडिओ आणि सुमारे पाच हजार प्रीलोडेड जुनी गाणी मिळतात. यासोबतच, यात स्पीकर आणि मेमरी कार्ड, यूएसबी स्लॉटही देण्यात येतो. कारवांचं मिनी व्हर्जनही उपलब्ध आहे.

टीव्ही

तुमच्या वडिलांना जर सिनेमा, मालिका किंवा खेळांचे सामने पाहण्याची आवड असेल, तर एक मोठ्या स्क्रीनचा टीव्ही (4K TV) हा त्यांच्यासाठी बेस्ट गिफ्ट ठरेल. आपल्या तरुणपणी ब्लॅक अँड व्हाईट-बॉक्स टीव्ही पाहिलेल्या वडिलांना तुम्ही घेऊन दिलेल्या मोठ्या टीव्हीचं भरपूर कौतुक असेल.

एअर प्युरीफायर

सध्या हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचा त्रास तुमच्या वडिलांना होऊ नये, यासाठी तुम्ही एक एअर प्युरीफायर (Air Purifier) त्यांना गिफ्ट करू शकता. अगदी दोन हजारांपासून हे एअर प्युरिफायर तुम्हाला अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट अशा वेबसाईट्सवर मिळेल.

व्हॉईस असिस्टंट स्पीकर

तुमच्या वडिलांना जर टेक्नॉलॉजी आवडत असेल, तर तुम्ही गुगल किंवा अमेझॉनचं व्हॉईस असिस्टंट स्पीकर (Voice Assistance Speaker) त्यांना गिफ्ट देऊ शकता. गुगलचं नेस्ट आणि अमेझॉनचं अ‍ॅलेक्सा हे अशा प्रकारचे प्रसिद्ध स्पीकर आहेत.

स्मार्ट स्केल

वाढत्या वयात वजनावर नियंत्रण ठेवणंही गरजेचं असतं. तुम्ही यासाठी आपल्या वडिलांना एक स्मार्ट स्केल (Smart Scale) गिफ्ट करू शकता. यामध्ये केवळ वजनच नाही, तर शरीरातील फॅट, पाण्याची पातळी अशा बऱ्याच गोष्टी दिसून येतात. अमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर अशा प्रकारचे स्मार्ट स्केल तुम्हाला मिळतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar NCP Second List: अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर! सात नव्या उमेदवारांची घोषणा, वडगाव शेरीचंही ठरलं

शाहरुखच्या 'चक दे इंडिया'च्या बदललेल्या कथेवर अन्नू कपूर संतापले; म्हणाले- मुस्लिम चांगला दाखवून पंडितांची थट्टा...

Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच; निफ्टी 24,400च्या खाली, कोणते शेअर्स कोसळले?

Share Market Today: आज कोणते शेअर्स असतील तेजीत? जागतिक बाजारात काय आहेत संकेत?

Ajit Pawar NCP: अजित पवार यांचा धडाका! काँग्रेससह भाजपलाही दिला धक्का; दोन माजी खासदारांसह आमदार राष्ट्रवादीत

SCROLL FOR NEXT